राज्यात पाऊस कधी परतणार? वाचा दिलासादायक अपडेट
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ऑगस्टच्या पहिल्याच दोन आठवड्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं. त्यामुळे आता शेतकरी बांधवांसह सर्वजण पाऊस पुन्हा कधी येणार, या प्रतीक्षेत आहेत.
यंदा मान्सूनच्या पावसाने उशिरा हजेरी लावली. जूनमध्ये कमी पाऊस झाला पण जुलै महिन्यात मात्र पावसाचं प्रमाण वाढलं आणि शेतकऱ्यांसह सर्वांना दिलासा मिळाला. ऑगस्टमध्येसुद्धा पावसाचा जोर असाच राहील, अशी अपेक्षा असताना धो धो कोसळणाऱ्या पावसाने अचानक उघडीप घेतली. ऑगस्टच्या पहिल्याच दोन आठवड्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं. त्यामुळे आता सर्वजण पाऊस पुन्हा कधी येणार, या प्रतीक्षेत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
मागील महिन्यात कोकणात अनेक भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. इर्शाळवाडी दुर्घटनेने अख्खा महाराष्ट्र हळहळला होता. असा प्रचंड हाहा:कार माजवून कोकणातही पाऊस थांबला आणि लख्ख ऊन पडलं. परंतु आता मात्र पुन्हा एकदा पावसाचे ढग दाटणार आहेत. कोकण विभागात महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement