बंगालच्या उपसागरात घडतंय काहीतरी भयंकर! मान्सूनवरही होणार परिणाम? समोर आली मोठी अपडेट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
देशातील विचित्र वातावरणामुळे मान्सूनचा पाऊस थांबला आहे. 12-18 जूनदरम्यान मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात पाऊस येईल, शेतकऱ्यांनी पेरणी थांबवावी.
देशातील वातावरण सध्या विचित्र झालं आहे. वेळेआधी मान्सून धडकला खरा मात्र नंतर गायब झाला. मान्सूनचा पाऊस अचानक थांबला आणि विचित्र वातावरण झालं. उत्तर भारतात काही ठिकाणी मुसळधार पावसानं भयंकर महापूर तर काही ठिकाणी हिटवेव सारखी उष्णता वाढली आहे. महाराष्ट्रात तर पाऊस आणि उकाडा असं दोन्ही सुरू आहे. पाऊस गेला की भयंकर घामाच्या धारा लागत आहे.
advertisement
advertisement
advertisement
12 जूननंतर महाराष्ट्रात पुन्हा पाऊस येण्याची शक्यता आहे. मान्सून पुन्हा सक्रिय होऊ शकतो. त्यामुळे आणखी थोडा वेळ मुसळधार पावसासाठी वाट पाहावी लागू शकते. शेतकऱ्यांना पेरणी करू नये असं सांगितलं आहे. जून अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस येईल असा अंदाज आहे. १२ ते १८ जूनदरम्यान मान्सून स्वतःहून गती घेईल.
advertisement
या कालावधीत मध्य भारत, महाराष्ट्राचे काही भाग आणि दक्षिण भारत जिथे आधीच मान्सून पोहोचलेला आहे तिथे पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात मान्सूनची वाटचाल थोडी मंदावली होती. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांमध्ये शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. पण आता हवामान खात्याने या सगळ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
advertisement
advertisement
१० जूनपर्यंत बंगालच्या उपसागरात एक चक्रीय प्रणाली तयार होईल. त्यानंतर ४८ तासांत ती संघटित होईल, असं स्कायमेटचे अध्यक्ष जी.पी. शर्मा यांनी स्पष्ट केलं. त्यांच्यानुसार ही प्रणाली आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून पुढे जाऊ शकते. सध्या भलेही पावसाने थोडा ब्रेक घेतलाय, पण १२ जूननंतर हवामानात मोठा बदल अपेक्षित आहे.










