'विदर्भातील काश्मीर' पाहिलंत का? नजारा पाहाल तर पुढची ट्रिप इथंच ठरवाल!
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
पावसाळी पर्यटनाचा विचार करत असाल तर विदर्भातील काश्मीर नक्की पाहा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासाच्या काळात चिखलदऱ्यात वास्तव्य केले. किचकाचा वध केल्यानंतर भीमाने येथील कुंडात हात धुतले होते. किचकाचा मृतदेह भीमाने ज्या दरीत फेकला होता ती दरी सुद्धा याच कुंडाच्या शेजारी आहे. भीमाने रक्तानं माखलेले हात धुतल्यामुळे या कुंडास भीमकुंड असे नाव पडले, असेही सांगितलं जातं.
advertisement
advertisement
चिखलदऱ्यात इतिहास प्रेमी, दुर्ग प्रेमींसाठी कायम आकर्षण ठरलेला गाविलगड हा पुरातन बहामनी किल्ला आहे. गडावरील असंख्य वास्तू इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. गाविलगड किल्ल्यात राणी महल, बिजली दरवाजा, किल्ल्यातील उत्तरेकडील जुनी तोफ याशिवाय सक्करदरा तलाव, मछली तलाव, काला पाणी तलाव आदी आवर्जून बघण्यासारखे आहेत. किल्ला पाहण्यासाठी एक संपूर्ण दिवस लागतो.
advertisement
advertisement
चिखलदऱ्यामध्ये गाडी मार्गाने येण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वर अमरावती हे शहर आहे. तेथून चिखलदरा हे 94 किमी अंतरावर आहे. चिखलदरा येथे येण्यासाठी थेट एसटी सेवा आहे. तर रेल्वेने यायचे झाल्यास मुंबई-हावडा या मुख्य रेल्वे मार्गावर बडनेरा रेल्वे स्टेशन आहे. तेथून अमरावतीसाठी एस.टी.किंवा खाजगी वाहन सहज उपलब्ध होते.