'प्रत्येक 9 मिनिटाला एक विवाहित पुरुष संपवतो आयुष्य', असं बॅनर का झळकले मारबत मिरवणुकीत? Photos
- Published by:News18 Marathi
Last Updated:
नागपूरमध्ये निघणारे मारबत हे शहराच्या सांस्कृतिक इतिहासातले मोठे वैभव आहे. सकाळ पासून हजारो नागपूरकर डिजे,ढोल ताशांच्या गजरात हा एकत्र येत हा उत्सव साजरा करत आहेत.
बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून वर्षभर शेतीत मशागत करणाऱ्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा होतो. विदर्भात पोळा दोन दिवस साजरा होतो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज तान्हा पोळा असतो. या दिवशी <a href="https://news18marathi.com/maharashtra/nagpur/">नागपूरमध्ये</a> निघणारे मारबत हे शहराच्या सांस्कृतिक इतिहासातले मोठे वैभव आहे.
advertisement
ईडापिडा, रोगराई, महागाई इत्यादी घेऊन जा गे मारबत,’ असं म्हणतं नागपूर शहरामध्ये मारबतच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. काळी, पिवळी आणि अनेक बडग्यांच्या रूपाने वाईट प्रवृत्तीचे दहन करण्यात यावेळी करण्यात येणार आहे. यंदा पिवळ्या मारबतीला 139 वर्ष पूर्ण होत आहे तर काळी मारबतीला 143 वर्ष पूर्ण होत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


