महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! नागपूरच्या शहाना फातिमाचे शिकागोत यश
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नागपूरच्या शहाना फातिमाने इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सायबर सुरक्षा क्षेत्रात प्रथम श्रेणीसह मास्टर डिग्री मिळवली आहे. तिचे PHD करून देशासाठी काम करण्याचे स्वप्न आहे.
advertisement
यामध्ये नागपूरच्या शहाना फातिमाची तिच्या सायबरसुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी विद्यापीठाने उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून निवड केली आहे. शहाना फातिमाने इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिकागो, अमेरिका येथून सायबर फॉरेन्सिक्स आणि सिक्युरिटी विषयात मास्टर डिग्री प्रथम श्रेणी आणि विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे.
advertisement
advertisement
अमेरिकेतील शिकागो येथील इल्लिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT, शिकागो) या नामांकित संस्थेने आपल्या प्रत्येक महाविद्यालयातून केवळ सातच विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. या निवडीत नागपूरच्या शाहाना फातिमाचा समावेश झाला असून, सायबरसुरक्षा क्षेत्रात तिच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे ही निवड करण्यात आली आहे.
advertisement
advertisement


