Nashik : टाक की उडी, नाशिककर रहाडीत मनसोक्त बुडाले; पेशवेकालीन प्रथा आहे तरी काय? Photos
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
नाशिकमध्ये रहाड रंगपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील रहाडीत उडी घेण्यासाठी तरुणाईने मोठी गर्दी केली होती. तेव्हा या रहाड रंगपंचमीचे महत्व काय आहे याविषयी जाणून घेऊयात.
advertisement
advertisement
advertisement
रंगात रंगून,रंगांची उधळण करीत रंगपंचमी साजरी करणाऱ्या या अनोख्या रहाडी रंगपंचमीचं उगमस्थान हे नाशिकला मानलं जातं. उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच येणारा हा उत्सव म्हणजे निसर्गाच्या अनोख्या किमयेचा जादूगारच. याच दिवसात येणाऱ्या अनेक रंगी फुलांपासून तयार केला जाणारा रंग म्हणजे या रहाडीचं खरं आकर्षण. कोणत्याही प्रकारचं केमिकल यात नसतं. तब्बल 5 तास ही फुलं उकळून, घोटून त्यांचा रस तयार केला जातो. रहाडी अर्थात खुल्या केलेल्या या भूमिगत हौदात असलेलं हे पाणी शरीराला अत्यंत गुणकारी मानलं जातं.
advertisement
या पाण्यात अंघोळ केल्याने, त्वचेचे आजार दूर होतात असेही अनेक दाखले आहेत. एकमेकांना धप्पा देत या पाण्यात ढकलण्याची एक वेगळीच गम्मत असते. रहाडी रंगपंचमी खेळून झाल्यावर या हौद पुन्हा बुझवले जातात. त्यावर सागवानी लाकडांच्या मोठमोठ्या रिफांचं आच्छादन टाकलं जातं. असं म्हणतात की, या सागाच्या रिफाही जवळपास 300 वर्ष जुन्या आहेत.