Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटात जिथे Thar मध्ये 6 जण संपले, तिथेच Hyundai Aura कोसळली, भयानक PHOTOS

Last Updated:
धक्कादायक म्हणजे, ज्या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी पुण्यातील तरुणांची महिंद्रा थार कार कोसळली होती त्याच ठिकाणी ही कार कोसळली. (संतोष दळवी, प्रतिनिधी)
1/7
 रायगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील सहा तरुण महिंद्रा थार गाडीने कोकणाला चालले होते. त्यांची गाडी ताम्हिणी घाटात कोसळली होती. या अपघातात सहाही तरुणांचा मृत्यू झाला होता. आता त्याच ठिकाणी त्याच गाडीजवळ Hyundai ची कार कोसळली आहे. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. 

advertisement
2/7
मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील माणगावाजवळ असलेल्या माणगावजवळ ताम्हिणी घाटात हा भीषण अपघात झाला आहे. hyundai aura ही कार दरीत कोसळली. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.

3/7
ताम्हिणी घाटामध्ये दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पुणे दिशेकडून माणगाव दिशेकडे येत असताना ह्युंदाई कंपनीची hyundai aura कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हजारो फूट खोल दरीत कोसळली.  या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.

4/7
ही कार हजार फूट खोल दरीत कोसळली. धक्कादायक म्हणजे, याच ठिकाणी सकाळी बसचा देखील अपघात झाला होता. धक्कादायक म्हणजे, ज्या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी पुण्यातील तरुणांची महिंद्रा थार कार कोसळली होती त्याच ठिकाणी ही कार कोसळली. hyundai aura ही थेट अपघातग्रस्त महिंद्रा थारवर जाऊन आदळली. 

5/7
या अपघातात hyundai aura कारचा चेंदामेंदा झाला आहे. गाडीचा फक्त सांगाडा उरला आहे. ड्रोनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनाचा शोध लागला आहे. रायगड जिल्ह्यातील सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे रेस्क्यू ऑपरेटर घटनास्थळावर दाखल झाले आहे.

6/7
 नोव्हेंबर महिन्यात याच स्पॉटवर पुण्यातील थार गाडीचा अपघात झाला होता.याा  अघतात सहा तरुणांचा मृत्यू झाला होता. तेव्हा सुद्धा ड्रोनच्या मदतीनेच शोध लागला होता.  आज पुन्हा त्याच ठिकाणी अपघात झाला आहे.

7/7
या अपघात ठिकाणी बॅरीगेटिंग न केल्यानं हा अपघात झाला असावा असं बोललं जातं आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी रेस्क्यू पथक दाखल झालं आहे. कारचालकाचा  मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. 

Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement