हाफ मर्डरचा गुन्हा असलेल्या सिद्धार्थ बनसोडेंना उमेदवारी का दिली? पुणेकरांचा सवाल दादांचा चढला पारा, म्हणाले...
- Reported by:Govind Wakde
- Published by:Prachi Amale
Last Updated:
गुंडगिरीला थारा देणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा करणारे अजित पवार तिकीटं देऊन गुंडांच्या कुटुंबियांना राजकीय अभय देत असून हा दांभिकपणा सुशिक्षित पुणेकरांच्या डोक्यात जातोय.
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना पक्षाकडून उमेदवारी दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे, अशातच त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये ही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उमेदवार दिला आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे पुत्र सिद्धार्थ बनसोडेवर दोन हाफ मर्डरचे गुन्हे दाखल आहेत असं असताना प्रभाग क्रमांक 9 मधून अजित पवारांनी त्यांना उमेदवारी दिली त्यानंतर अजित पवारांवर विरोधकांनी प्रचंड टीका केली. त्यानंतर अजित पवार यांना उमेदवारीविषयी विचारले असता दादांचा पारा चांगलाच चढल्याचे पाहायला मिळाले.
कोयते नाचवणारे गुंड ही पुण्याची नवी ओळख बनताहेत. त्यांची दादागिरी संपवण्यासाठी पुणे पोलिस गुडांची धिड काढताहेत तर राजकारणी त्यांना निवडणुकीची तिकीटं देवून त्यांच्या राजकीय मिरवणुकीची तयारी करताहेत. गुंडगिरीला थारा देणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा करणारे अजित पवार तिकीटं देऊन गुंडांच्या कुटुंबियांना राजकीय अभय देत असून हा दांभिकपणा सुशिक्षित पुणेकरांच्या डोक्यात जातोय.
advertisement
तीन गुंडांच्या घरात तिकिटांची खैरात
राजकारणाकडे समाजसेवा म्हणून पाहिलं जाण्याचा काळ संपलाय आता राजकारणाच्या माध्यमातून वर्चस्व आणि त्यातून पद आणि पैसा मिळवला जात असल्याचं सर्रास दिसतं. पण, वर्चस्वाच्या या राजकारणात गुंडांचं शुद्धीकरण करण्याचीही जुनी पद्धत पुण्यात पुन्हा एकदा सुरू झाल्याचं चित्र आहे. त्याचं कारण म्हणजे, गुंड आणि गुन्हेगारांच्या कुटुंबीयांना मिळालेल्या उमेदवाऱ्या विशेष म्हणजे, राज्यातील सत्ताधारी पक्षांकडूनच या गुंडांच्या राजकीय प्रवेशाचा मार्ग सुकर केला जातोय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी एक-दोन नव्हे तर तीन गुंडांच्या घरात तिकिटांची खैरात वाटलीय.
advertisement
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
बनसोडे यांच्या उमेदवारीविषयी विचारल्यावर अजित पवार प्रचंज संतापले उलट उत्तर देण्याऐवजी त्यांनी प्रतिप्रश्न केला. गुन्हा दाखल केला म्हणजे तो आरोपी होतो का? माझ्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप झाला, ज्यांनी आरोप केला त्यांच्या बरोबर सत्तेत बसलो असे म्हणत संतापले.
राजकारण आणि गुन्हेगारी यांचं साटोलोटं आहे की काय?
advertisement
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आंदेकर आणि कोमकरांमध्ये संघर्ष सुरू आहे. अशातच दोन्हीकडच्या लोकांमध्ये आता राजकीय संघर्षाचा नवा अध्याय सुरु झाला आहे. कारण, पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही कुटुंबातील महिला उमेदवार आमनेसामने आले आहेत. प्रभाग क्रमांक 23 मधून गुंड बंडू आंदेकरची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सून सोनाली वनराज आंदेकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पुण्यातील ही स्थिती पाहता, राजकारण आणि गुन्हेगारी यांचं साटोलोटं आहे की काय? अशी टीका सुरू झालीय. आता राजकीय पक्षांनी गुंडांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देताना मतदारांना गृहीत धरलं असलं, तरी आता मतदार या गुंडांचा राजकीय प्रवास सुकर होवू देतात की त्यांना इथेच रोखतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
advertisement
हे ही वाचा :
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 7:17 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
हाफ मर्डरचा गुन्हा असलेल्या सिद्धार्थ बनसोडेंना उमेदवारी का दिली? पुणेकरांचा सवाल दादांचा चढला पारा, म्हणाले...









