नवरात्रोत्सवात पलईंच्या मूर्तींना विक्रमी मागणी, 15 लाखांची उलाढाल..!
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
वडिलोपार्जित व्यवसायाला चालना देण्याचे काम चिकलठाणा येथील सुजल पलई करत आहे. ते देवींची मूर्ती बनवण्याचे काम करतात त्यांच्याकडे दीड फुटांपासून ते सहा फुटांपर्यंत विविध आकाराच्या 500 देवींच्या मूर्ती तयार केल्या आहेत. पलई यांच्या मूर्ती बनवण्याच्या कारखान्यात 8 कामगार आहे. त्यांना देखील रोजगार मिळाल्याने ते समाधानी आहेत, यंदा नवरात्रोत्सवामुळे त्यांच्या मोठ्या प्रमाणात देवींच्या मूर्ती बुक झाल्या आहे.
advertisement
पलई यांच्या मूर्ती बनवण्याच्या कारखान्यात 8 कामगार आहे. त्यांना देखील रोजगार मिळाल्याने ते समाधानी आहेत, यंदा नवरात्रोत्सवामुळे त्यांच्या मोठ्या प्रमाणात देवींच्या मूर्ती बुक झाल्या आहे. नवरात्रोत्सवाच्या सीजनमध्ये या व्यवसायाच्या माध्यमातून जवळपास 10 ते 15 लाख रुपयांची उलाढाल होते आणि सर्व खर्च वजा करून 6 ते 7 लाख रुपये निव्वळ नफा मिळत असल्याचे असल्याचे पलई यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
advertisement
advertisement
मातीची मूर्ती तयार जरी केली तर त्यासाठी पीओपी मूर्तींच्या तुलनेत मेहनत जास्त प्रमाणात असते. तसेच मातीची मूर्ती महाग देखील असते त्यामुळे मोजक्याच प्रमाणात या मूर्तींची विक्री होते. तर जास्त प्रमाणात पीओपी मूर्तींची विक्री केली जाते व 1000 रुपयांपासून ते 18000 रुपयांपर्यंत मूर्ती उपलब्ध असल्याचे पलई यांनी म्हटले आहे.