'माझा बाप आणि भाऊ जिंकून हरले पण सक्षम मरून जिंकला' आंचलने हत्येच्या आधीपासूनच सगळं सांगितलं
- Reported by:Mujeeb Shaikh
- Published by:Sachin S
Last Updated:
'सक्षम आज नसला तरी काय झालं, आमचं प्रेम आहे ना, मी त्याचाशीच लग्न करेल. माझे घरचे त्याला मारून हरले आहे पण तो हरूनही जिंकला आहे. आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल, त्याच्यासोबतच हमेशा राहिल.' (मुजीब शेख, प्रतिनिधी)
त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं करु दे की ! मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ? कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता आपण सगळ्यांनी ऐकली असेल. पण ही कविता समाजाला मान्य आहे का तर नाही. याचं कारण म्हणजे, प्रेमसंबंधाला विरोधातून आणखी एका तरुणाची मुलीच्या बापाने हत्या केल्याची घटना नांदेडमध्ये घडली. बापाला मुलाची जात अडवी आली आणि त्याने या तरुणाला निर्घृणपणे संपवलं. पण, दुसरीकडे त्याची प्रेयसीने आपल्या प्रियकराच्या पार्थिवाशी लग्न करून बापाच्या कृत्याला उत्तर दिलं. तिने आपल्यासोबत काय काय घडलं, हे सगळं सांगितलं.
advertisement
advertisement
advertisement
सक्षमवर एमपीडी पडली होती. जेलमधून सुटून आल्यावर माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावर होते, असं ते बोलते होते. मला ते धमकी देत होते, आम्ही त्याला मारून टाकणार, गोड बोलून संपवणार, नशा करून त्याला मारणार. त्याच्यावर ३ गोळ्या झाडल्या तरी त्याला काही झालं नव्हतं. तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी घालून त्याला मारलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









