Nag Panchami 2025: शिराळ्यात जिवंत नागाची पूजा कधी सुरू झाली? जगभरात प्रसिद्धी कशी मिळाली?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Shirala Nag Panchami: शिराळ्यातील जिवंत नागाची पूजा जगप्रसिद्ध आहे. काळाच्या ओघात नागपंचमी साजरी करण्याच्या पद्धतीत बदल घडत आहे.
शिराळ्यातील नागपंचमी जगभरात प्रसिद्ध आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून इथं जिवंत नागाची पूजा केली जाते. याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. दहाव्या अकराव्या शतकात महायोगी गोरक्षनाथ महाराज लोकांचे प्रबोधन करत शिराळ्यात आले होते. श्रावण शुद्ध पंचमी दिवशी भिक्षा मागण्यासाठी ते महाजनांच्या घरी गेले. त्यावेळी एक गृहिणी मातीच्या नागाची पूजा करत होती. भिक्षा द्यायला वेळ का झाला? या गोरक्षनाथांच्या प्रश्नावर तिने नाग पूजेचे कारण सांगितले.
advertisement
advertisement
advertisement
पूर्वी नागपंचमी अंबामाता मंदिर बाहेरील मोठ्या वडाच्या झाडाखाली भरत होती बैल गाडीतून नागाची मिरवणूक काढत होते. वाहनांची सोय नसल्याने कमी लोक येत होते. 1954 साली कै. दत्ताजीराव पोटे व इतर सहकाऱ्यांनी किर्लोस्करांना बोलावले. त्यावेळी स्वतः मुकुंदराव किर्लोस्कर, लेखक धों. म. मोहिते व छायाचित्रकार आले होते.
advertisement
बत्तीस शिराळ्यातील नागपंचमी उत्सव स्वतः प्रत्यक्ष पाहून याची माहिती जुलै 1955 च्या ‘किर्लोस्कर’ मासिकात प्रसिद्ध केली. त्यानंतर त्याची चित्रफीत अमेरिकेत दाखवली. तेव्हापासून बत्तीस शिराळ्यातील जिवंत नागाचा पूजेचा लौकिक जगभर वाढला. नॅशनल जिऑग्राफीने शिराळ्यात येऊन या प्रथेला पुन्हा प्रसिद्धी दिली. यानंतर जिवंत नागाच्या पूजेसाठी सांगलीतील बत्तीस शिराळा जगभर प्रसिद्ध झाले.
advertisement
सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील मोहिते वडगावचे पत्रकार, लेखक धों. म. मोहिते यांनी आपल्या लेखातून त्याकाळच्या नागपंचमी उत्सवाचे सविस्तर वर्णन केले आहे. तसेच मुकुंदराव किर्लोस्कर यांच्यासोबत असणारे छायाचित्रकार गायकवाड यांनी टिपलेली नागपंचमी उत्सवातील छायाचित्रे देखील लेखासोबत जुलै 1955 च्या किर्लोस्कर मासिकातून प्रसिद्ध झाली होती.
advertisement
काळाच्या ओघात नागपंचमी साजरी करण्याच्या पद्धतीत बदल घडत आहे. मात्र 1953 साली शिराळ्यातील नागपंचमी एक लोकोत्सव आणि धार्मिक परंपरा कशी होती याची माहिती लेखक धों.म. मोहिते यांच्या लेखातून समजते. गेल्या काही काळापासून जिवंत नागाची पूजा बंद असली तरी प्रतिकात्मक उत्सव सध्याही शिराळ्यात दरवर्षी होत असतो.


