भारतातला सर्वात उंच, आकर्षक धबधबा साताऱ्यात! ओसंडून वाहू लागला
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
मुसळधार नसला तरी आता पाऊस दिवसभरातून एकदातरी हजेरी लावतोच. पावसामुळे झाडं, रान, मळे अगदी छान धुवून निघाले आहेत, त्यामुळे सगळीकडे मनमोहक अशी हिरवळ दिसून येते. निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी हा काळ उत्तम आहे. विशेष म्हणजे आता नदी-नाले झुळझुळ वाहू लागले असून त्यांच्या आजूबाजूला हिरवळ निर्माण झालीये, शिवाय धबधबेही जोमाने कोसळू लागले आहेत. (शुभम बोडके, प्रतिनिधी / सातारा)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
खरंतर पूर्ण सातारा जिल्हा नैसर्गिक संपत्तीच्या दृष्टीने अतिशय संपन्न आहे. इथं अनेक लहान-मोठे धबधबे आहेत. त्यामुळे राज्यभरातून हजारो पर्यटक याठिकाणी येतात. पावसाळ्यात तर धबधबे भरून वाहायला लागले की पर्यटकांची मोठी गर्दी होते.