राज ठाकरेंच्या गाडीवर कुणी फेकल्या सुपाऱ्या, मनसेसैनिक काय करत होते? बीडमधील पहिले PHOTOS

Last Updated:
'कुणाची सुपारी घेऊन आले याचा उत्तर द्या' असं म्हणत 'सुपारी बहाद्दर चले जाव'च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी मनसे सैनिक आणि शिवसैनिकांमध्ये मोठा राडा झाला.
1/8
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. मात्र, मराठा आरक्षणाबद्दल विधान केल्यामुळे ठिकठिकाणी राज ठाकरे यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. पण आज बीडमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर राडा घातला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकून मारल्या आणि सुपारी बाज चले जावो, अशी घोषणाबाजी केली.

advertisement
2/8
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. बीडमध्ये आगमन झाले असता शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राज ठाकरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.

3/8
यावेळी राज ठाकरे यांच्या गाडीवर   ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपारी फेकून सुपारी बाज चले जावो अशा घोषणा दिल्या. यावेळी मनसे सैनिक आणि शिवसैनिकामध्ये झटापट झाली.

4/8
बीडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेणार आहेत. बीड शहरामध्ये अनविता हॉटेल समोर पोहोचले असता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.

5/8
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या राड्यामुळे उपस्थितीत असलेल्या मनसेसैनिक धावून गेले.  त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये एकच झटापट झाली. पण, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही कार्यकर्त्यांना बाजूला केलं.

6/8
बीड जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीवर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी सुपाऱ्या फेकून निषेध व्यक्त केला.

7/8
'कुणाची सुपारी घेऊन आले याचा उत्तर द्या' असं म्हणत 'सुपारी बहाद्दर चले जाव'च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी मनसे सैनिक आणि शिवसैनिकांमध्ये  मोठा राडा झाला.
'कुणाची सुपारी घेऊन आले याचा उत्तर द्या' असं म्हणत 'सुपारी बहाद्दर चले जाव'च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी मनसे सैनिक आणि शिवसैनिकांमध्ये मोठा राडा झाला.
advertisement
8/8
मनसे सैनिकांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि शिवसेना कार्यकर्त्यावर मारहाण करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत मोठा वाद थांबवला. मात्र राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपारी फेकल्याने मनसे सैनिक आक्रमक झाले होते.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement