लालपरीतून प्रवास केला, आता एसटी स्थानक घेऊ शकता दत्तक, काय आहे योजना?

Last Updated:
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यातील बसस्थानकांना स्वच्छ आणि सुंदर बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
1/8
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यातील बसस्थानकांना स्वच्छ आणि सुंदर बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. शिवाय त्याबाबतच्या सूचना सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत. याच अनुषंगाने बसस्थानक दत्तक योजना जाहीर करण्यात आली आहे.

advertisement
2/8
स्वच्छ व सुंदर बसस्थानकांसाठी स्वास्थ्य अभिव्यक्ती सूचना मागविण्यात आल्या असून वर्धा जिल्ह्यातील पाच बसस्थानके यामुळे चकाचक होणार आहेत. महाराष्ट्र दिनापासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान हाती घेण्यात आले आहे.

3/8
राज्यातील 580 बसस्थानके स्वच्छ व सुंदर बनविण्याचा मानस रापमचा आहे. बसस्थानक परिसरात स्वच्छतागृहे, परिसराचे सुशोभिकरण आदी कामे विविध उद्योगांचे सहकार्य घेत करण्यात येणार आहेत. या अभियानांतर्गत उद्योजक, व्यापारी संस्थांना बसस्थानक दत्तक घेता येणार आहे.

4/8
संबंधित संस्थांनी बसस्थानकांचे किरकोळ निर्जंतुकीकरण, परिसर स्वच्छता आणि उद्योजकांना बसस्थानक परिसरात डागडुजी, विद्युत उपकरणे दुरुस्ती, सौंदर्यीकरण आदी कामे करणे, प्रसाधनगृहांची किरकोळ दुरुस्ती अपेक्षित आहे. त्या बदल्यात संबंधित उद्योजकांना आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्याची संधी दिली जाणार आहे.

5/8
  बसस्थानक स्वच्छ आणि सुंदर व्हावे, या उद्देशाने पाचही बसस्थानके दत्तक देण्यासाठी रापमकडून विविध संस्था, उद्योजकांकडून स्वास्थ्य अभियोग्य सूचना मागविण्यात आल्या आहेत. इच्छुक उद्योग, संस्थांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वर्धा जिल्ह्यातील बसस्थानक स्वच्छ आणि सुंदर व्हावे, या उद्देशाने पाचही बसस्थानके दत्तक देण्यासाठी रापमकडून विविध संस्था, उद्योजकांकडून स्वास्थ्य अभियोग्य सूचना मागविण्यात आल्या आहेत. इच्छुक उद्योग, संस्थांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
6/8
या अभियानांतर्गत आर्वी, तळेगाव, पूलगाव, हिंगणघाट आणि वर्धा ही बसस्थानके दत्तक दिली जाणार आहेत. त्यासाठी स्वास्थ्य अभिव्यक्ती सूचनाही मागविण्यात आल्या आहेत. दत्तक विधी पूर्ण होत लवकरच हे पाचही बसस्थानके चकाचक होणार आहेत.

7/8
बसस्थानकाच्या मुख्य इमारतीची किरकोळ डागडुजी, विद्युत उपकरणांची दुरुस्ती, विद्युत दिवे व पंखे सुस्थितीत करणे, किरकोळ रंगरंगोटी, प्रसाधनगृहांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण आदी कामे केली जाणार आहेत. त्यामुळे दत्तक दिली जाणारी पाचही बसस्थानके चकाचक केली जाणार आहेत.

8/8
या योजनेत लघु, मध्यम, मोठे उद्योजक तसेच व्यापारी संस्था यांना सहभागी होता येणार आहे. शिवाय प्रस्तावही दाखल करता येणार आहे. मात्र अमली पदार्थ, तंबाखू, गुटखा, मद्य, तत्सम उत्पादक सेवा करणाया संस्थांना यात सहभागी होता येणार नाही.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement