महाराष्ट्रातलं असं रुग्णालय, जिथे पैसे घेण्यासाठी काऊंटरच नाही, कारण... PHOTOS
- Published by:News18 Marathi
Last Updated:
रुग्णालय म्हटलं की अनेकांच्या मनात धास्ती बसते. मात्र, याठिकाणी गोरगरीब आणि गरजू गर्भवती महिलांना मोफत उपचार दिले जातात.
advertisement
advertisement
वाघापूर येथील श्री सत्य साई संजीवनी माता आणि बाल रुग्णालयात गर्भवती महिलांना तपासणी, सोनोग्राफी, गरोदरपणात आवश्यक औषधी मोफत दिल्या जात आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांची गैरसोय टाळण्यासाठी श्री मधुसूदन साई यांच्या संकल्पनेतून रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. श्री सत्य साई हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. श्री. श्रीनिवास यांच्या मार्गदर्शनात रुग्णालय कार्यरत आहे.
advertisement
advertisement
advertisement
या रुग्णालयात येणाऱ्या कोणत्याच गर्भवती मातेकडून शुल्क घेतले जात नाहीत. या रुग्णालयात कोणत्याच प्रकारचा भेदभाव केला जात नाही गरीब, गरजू, मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत तसेच शहरी आणि ग्रामीण अशा सर्व रुग्णांना या ठिकाणी निःशुल्क उपचार दिले जातात. सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने या रुग्णालयाला कार्यान्वित करण्यात आले आहे.
advertisement
बालकांचे हृदयविकार यावर निदान करण्यासाठी ही तपासणी केली जाते. त्या संदर्भात संस्थेचे हॉस्पिटल मुंबई खारघरला किंवा रायपूर येथे आहे. त्या ठिकाणी रुग्णांना पोहोचवून गरज असल्यास शस्त्रक्रियेसाठीही मदत केली जाते. यवतमाळ येथे असलेल्या या रुग्णालयाचा गरजूंनी नक्की लाभ घ्यावा, असं आवाहन सतचिकीस्ता प्रसारक मंडळ यवतमाळ येथील सचिव प्राचार्य.डॉ. प्रकाश नांदुरकर यांनी केले आहे.


