WhatsApp कॉलवर बोलताना होणार नाही डिस्टर्ब, येतंय जबरदस्त फीचर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
WhatsApp Noise Cancellation Feature: व्हाइस आणि व्हिडिओ कॉल चांगला व्हावा यासाठी व्हॉट्सअॅप लवकरच एक भारी फीचर आणणार आहे. चला पाहूया हे फीचर कोणतं आणि कसं करेल काम.
WhatsApp New Feature: व्हॉट्सअॅप आता सर्वांच्याच गरजेचं झालं आहे. ऑफिसचं काम असो किंवा पर्सनल सर्वच याचा उपयो करतात. आता मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप कॉलिंग एक्सपीरियन्स आणखी चांगला व्हावा यासाठी नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे. नुकतंच कंपनी व्हाइस आणि व्हिडिओ कॉलसाठी नॉइस कॅन्सिलेशन फीचर टेस्ट करताना दिसली. हे फीचर आगामी अपडेटसह रोल आउट केलं जाऊ शकतं. नावावरुनच कळतं की, हे फीचर कॉल दरम्यान बॅकग्राउंडमधून येणारा नॉइस कमी करेल. ज्यामुळे बोलणं आणखी सुविधाजनक होईल.
हे फीचर कसं काम करेल?
तुम्ही गर्दीच्या ठिकाणी येत-जात असाल तर कॉल दरम्यान बॅकग्राउंडमध्ये ट्रॅफिकचा आवाज, लोकांचा आवाज आणि खुप रस्त्यावरील आवाज येतो. अनेकदा हा आवाज एवढा असतो की, फोनवर बोलणाऱ्या समोरच्या व्यक्तीला तुमचा आवाज स्पष्ट ऐकू येत नाही. व्हॉट्सअॅपचा नवा फीचर हीच समस्या दूर करेल. हे फीचर तुमच्या आजुबाजूचा आवाज ओळखून फिल्टर करेल आणि समोरच्या यूझरजवळ फक्त तुमचा आवाज जाईल. मग मागे गाड्यांचे हॉर्न वाजत असतील तरीही त्याचा आवाज येणार नाही.
advertisement
अँड्रइड आणि आयफोन दोन्हीमध्ये करेल काम
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे फीचर अँड्रॉइड आणि अॅपल डिव्हायसेसवर काम करेल. आयफोन आणि आयपॅडमध्ये पहिलेच बिल्ट-इन व्हॉइस आयसोलेशन फीचर आहे. जे कॉल दरम्यान बॅकग्राउंड नॉइस कमी करते. व्हॉट्सअॅप व्हिडिओ सेटिंगच्या माध्यमातून याचा वापर करते. अँड्रॉइडमध्ये असं फीचर मिळत नाही. अशावेळी व्हॉट्सअॅपचं हे नवं नॉइस कॅन्सिलेशन फीचर अँड्रॉइड यूझरला मोठी सुविधा देऊ शकते.
advertisement
यूझरकडे असेल पूर्ण कंट्रोल
या फीचरचं पूर्ण कंट्रोल यूझरच्या हातात असेल. म्हणजेच यूझर हा ठरवले की, नॉइस कॅन्सलेशन फीचरचा वापर करायचा आहे की नाही. त्याच्याजवळ हे फीचर बंद करण्याचाही ऑप्शन असेल. सोबतच या फीचरचा एंड-टू-एंड एन्क्रिप्शन प्रोटेक्शनचाही कोणताही परिणाम होणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 3:56 PM IST






