Ladki Bahin Yojana: 1500 रुपये नको गं बाई! नाशिकच्या लाडक्या बहिणींची योजनेतून माघार, नेमकं कारण काय?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
लाडकी बहीण योजनेत नाशिकमधील 1600 महिलांनी नावं मागे घेतली आहेत. EKYC बंधनकारक असून इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी ही योजना सोडली आहे.
लाडकी बहीण योजना महायुती सरकारची सर्वात लाडकी योजना आहे. या योजनेत महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये खात्यावर दिले जातात. आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे पैसे सरकार देतं. अनेक महिलांनी हे पैसे साठवून त्यातून स्वत: चं छोटं मोठं काम सुरू केलं आहे. तर काही महिला लाडकी बहीण सोबत इतर योजनांचा देखील लाभ घेत आहेत. अशा महिलांची मात्र आता पंचाईत झाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
नाशिकमध्ये 5 ते 10 महिला रोज आपलं नाव या योजनेतून कमी करावं यासाठी येत आहेत. इतर सरकारी योजनांचा लाभ पूर्णपणे घेता येत नसल्याने आणि त्याची रक्कम जास्त असल्याने अनेक महिलांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे. या योजनेतून महिलांनी १५०० रुपये मिळतात तेही एक महिना उशिरा, त्यामुळे महिलांनी ही योजना सोडून दुसऱ्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ही आयडिया वापरली आहे.
advertisement
advertisement


