आता शेतकरी करतील ड्रोननं फवारणी, खरेदीसाठी मिळतंय 80 टक्के अनुदान
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी असून अनुदानावर फवारणी ड्रोन मिळत आहे
advertisement
advertisement
शेतीच्या वापरासाठी शासकीय अनुदानातून आपल्याला ड्रोन खरेदी करता येऊ शकतो. राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून ड्रोनसाठी अनुदान दिले जाते. गरुडा कंपनीच्या ड्रोनची किंमत आठ लाख 17 हजार असून 60 हजार रुपये ड्रोनच्या परवान्यासाठी खर्च येतो. त्यामुळे ड्रोन खरेदीसाठी एकूण नऊ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. यावर सरकारी अनुदान मिळते, असे ड्रोन पायलट सतीश माकोडे सांगतात.
advertisement
शेतीसाठी ड्रोन खरेदी करायचे असल्यास 40 ते 80 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. महिला बचत गटांसाठी 80 टक्के अनुदान दिले जाते. फार्मा प्रोड्युसर कंपनींना 75 टक्के अनुदान मिळते. तर बीएससी ऍग्रीच्या विद्यार्थ्यांना 50 टक्के आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना 40 टक्के सबसिडी दिली जाते. तर लोनवर ड्रोन घेण्यासाठी 90 टक्के पर्यंत कर्ज घेता येते, असेही माकोडे सांगतात.
advertisement