Agriculture News : मराठवाड्यातील खरबुजाला परदेशातून मागणी; किती मिळाला दर? पाहा PHOTOS
- Published by:News18 Marathi
Last Updated:
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याचा खरबूज शेतीचा प्रयोग यशस्वी झाला असून जिल्हाभरातून लोक खरबूज पाहण्यासाठी येत आहेत. तर या खरबुजाला परदेशातून मागणी आली आहे.
मराठवाड्यातील शेतकरी आपल्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विविध प्रयोग करत आहेत. धाराशिवमधील काजळाचे प्रगतशील शेतकरी किरण आहेर यांनी आपल्या दीड एकर शेतात खरबूज लागवड केली. त्यांचा खरबूज शेतीचा प्रयोग यशस्वी झाला असून जिल्हाभरातून लोक खरबूज पाहण्यासाठी येत आहेत. तर या खरबुजाला परदेशातून मागणी आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आहेर यांच्या खरबूज शेतीला केनिया, बेंगलोर, मुंबई येथील व्यापाऱ्यांनी भेट दिली आहे. केनीयातील व्यापाऱ्याने 23 रुपये प्रति किलोचा उच्चांकी दर ठरवला आहे. त्यामुळे आहेर यांना चांगले आर्थिक उत्पन्न होणार आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीच्या नादी न लागता व्यापारी शेती करणे काळाची गरज बनली आहे, असे मत यावेळी आहेर यांनी व्यक्त केले.