महाराष्ट्रातीलं ‘हे’ संपूर्ण गावच करतं चुक्याची शेती, कमी खर्चात शेतकऱ्यांना लाखोंचे उत्पन्न

Last Updated:
धाराशिव जिल्ह्यात एक असं गाव आहे ज्या गावात पालेभाजी प्रकारातील चुका या पालेभाजीचे उत्पादन घेतले जाते. या शेतीतून शेतकऱ्यांना लाखोंची कमाई होत आहे.
1/6
शेती करताना शेतकरी नवनवीन प्रकारच्या पिक पद्धतीचा अवलंब सध्याचा घडीला करत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील एका गावात चुक्याची शेती केली जाते. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल परंतु होय हे खरं आहे.

advertisement
2/6
धाराशिव जिल्ह्यात एक असं गाव आहे ज्या गावात पालेभाजी प्रकारातील चुका या पालेभाजीचे उत्पादन घेतले जाते आणि विशेष म्हणजे पालेभाजीसाठी नाही तर बियाण्यांच्या विक्रीसाठी उत्पादन घेतले जाते. या शेतीतून शेतकऱ्यांना लाखोंची कमाई होत आहे.

3/6
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द या गावात चुक्याची शेती केली जाते. पिंपळा खुर्द या गावातील शेतकरी खरीप हंगामात पावसाळी कांद्याचे उत्पादन घेतात. पावसाळी कांद्यानंतर ते कांद्याच्या शेतात चुका या पिकाची लागवड करतात.

4/6
पिंपळा खुर्द गावातील शेतकरी बालाजी पाटील यांच्याकडे 7 एक्कर चुक्याची लागवड केलेली आहे. चुक्याला बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे या गावात चुका उत्पादन घेतले जाते. चुका या पिकाच्या लागवडीतून चांगलं उत्पादन होत असल्याचेही यावेळी शेतकरी बालाजी पाटील यांनी सांगितले.

5/6
एक एकर चुका लागवडीसाठी 15 ते 20 हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो तर चुक्याची लागवड सरी पद्धतीने, इनलाईन ड्रीपच्या सहाय्याने देखील करता येते. चुक्याचे बी तयार झाले की हैदराबाद येथे विक्री केली जाते.

6/6
हैदराबाद येथे बियाण्यांना मोठी मागणी आहे. चुक्याला 50 ते 60 रुपयांपासून शंभर ते दीडशे रुपयांपर्यंतचा बाजारभाव मिळतो. चुका लागवडीतून एकरी 50 ते 60 हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंतचे उत्पादन होत असल्याचे शेतकरी बालाजी पाटील यांनी सांगितले.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement