कमी पाण्यात पिकवा लाल सोन, नेमकं काय कराल? शेतकरीदादा हे वाचाच
- Published by:News18 Lokmat
- local18
Last Updated:
सध्याच्या काळात अनेक शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळत आहेत. त्यामध्ये फळबागांची शेती करण्याला अधिक पसंती देत आहेत.
advertisement
डाळिंबाची शेती फायदेशीर आहे. परंतु, त्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज असते. अन्यथा मोठा खर्च वाया जाण्याची शक्यता असते. बीडमधील कृषी अभ्यासक रामेश्वर चांडक यांनी डाळिंबाच्या शेतीबाबत माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
डाळिंबाची लागवड ही कोणत्याही जमिनीत घेण्यात येते. अति हलक्या जमिनीपासून भारी किंवा मध्यम काळी व सुपीक जमीन डाळींबाच्या लागवडीसाठी चांगली असते. या जमिनीत झाडांची वाढ चांगली होते. हलक्या प्रतीची, खडकाळ मुरमाड डोंगर उताराच्या जमिनी सुध्दा चालतात. मात्र जमिनीत पाण्याचा निचरा होणे आवश्यक आहे.
advertisement
डाळिंब हे दुष्काळ सहन करणारे फळ पीक आहे. ते काही प्रमाणात पाण्याची टंचाई टिकवून ठेवू शकते. फळांचे फाटणे कमी करण्यासाठी नियमित सिंचन देखील आवश्यक आहे. हिवाळ्यात 9 ते 12 दिवसांच्या अंतराने, तर उन्हाळ्यात 4 ते 5 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. बहुतांश शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाद्वारे पाणी पुरवठा करतात. त्यामुळे पाण्याची बचत केली जाते आणि खते वापरणे सोयीचे होते.
advertisement
advertisement