कधी सायकल चालवली नाही पण, आता उडवतेय ड्रोन; पाहा ड्रोन दीदीच्या जिद्दीचा प्रवास
- Published by:News18 Marathi
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
कधी सायकल देखील चालवली नाही पण, आता जालन्यातील संगीता शिंदे या ड्रोन उडवत आहेत. जिल्ह्यातील पहिली ड्रोन दीदी होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.
आयुष्यात काहीतरी करण्याची उत्कट इच्छाशक्ती असेल आणि प्रामाणिक प्रयत्न असतील तर आपण कोणतंही यश नक्कीच मिळवू शकतो. <a href="https://news18marathi.com/maharashtra/jalna/">जालन्यातील</a> महिला शेतकरी संगीता शिंदे यांनी हे सिद्ध करून दाखवले. केवळ दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या शिंदे यांनी कधी सायकल देखील चालवली नाही. पण त्यांनी आता ड्रोन फवारणीचं प्रशिक्षण पूर्ण केलंय. जालना जिल्ह्यातील पहिल्या 'ड्रोन दीदी' होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी हे यश मिळवलं असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
advertisement
संगीता शिंदे यांचा जिल्ह्यातील पहिली ड्रोन दीदी होण्याचा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात कुटुंबीयांनी बचत गट सुरू करण्यास देखील विरोध केला. पावलोपावली अडथळे होते. मात्र त्यांनी या अडथळ्यांवर मात करत आपलं इच्छित ध्येय पूर्ण केलंय. आता त्यांना केवळ तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील महिलांना ड्रोन प्रशिक्षण देण्याची इच्छा आहे. याबाबत शिंदे यांनीच माहिती दिलीय.
advertisement
पारंपरिक शेती करण्यासाठी आजकाल मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे शेतकरी आधुनिक आणि यांत्रिक शेतीकडे वळत आहे. शेतात फवारणी करण्यासाठी अधिक वेळ लागतो. पिकांवर विविध कीटकनाशकांची फवारणी सुलभ पद्धतीने करता यावी. तसेच आपत्कालीन परिस्थितीत शेतक-यांना मदत करता यावी, यासाठी ड्रोनद्वारे फवारणीची संकल्पना पंतप्रधान मोदी यांनी पुढे आणली आहे. या उपक्रमात महिला बचत गटांना ड्रोन देण्यात येणार आहेत. ड्रोन चालवण्यासाठी बचत गटांच्या महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षित महिलांना 'ड्रोन दीदी' म्हणून संबोधले जात आहे.
advertisement
advertisement
यासाठी उमेद अभियानातील उपजिवीका विभागाचे जिल्हा व्यवस्थापक गणेश तिडके यांनी सहकार्य केले. पुढे ड्रोन पायलटच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली. पुणे जिल्ह्यातील शिवडी इथे पीपीसीएस प्रशिक्षण सुरू झाले. इंग्रजी भाषेची जरा अडचण आली. मात्र जिद्दीने हे प्रशिक्षण पूर्ण केलं. पुढे फलटण येथेही ड्रोन पायलटचे प्रशिक्षण घेतले, असे संगीता यांनी सांगितले.
advertisement
advertisement


