पुण्यात पिकतोय चक्क निळा तांदूळ, पाहा कशी होतीय शेती PHOTOS

Last Updated:
पुण्यातील शेतकऱ्यानं इडोनेशिया, मलेशिया, थायलंड सारख्या देशात पिकणाऱ्या निळ्या तांदळाचे पीक घेण्याचा प्रयोग केला आहे.
1/9
 अलिकडे काही शेतकरी आपल्या शेतात नव नवे प्रयोग करताना दिसतात.  जिल्ह्यातील मावळ मुळशी भागात इंद्रायणी तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
अलिकडे काही शेतकरी आपल्या शेतात नव नवे प्रयोग करताना दिसतात. पुणे जिल्ह्यातील मावळ मुळशी भागात इंद्रायणी तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
advertisement
2/9
आता येथील शेतकऱ्यानं इडोनेशिया, मलेशिया, थायलंड सारख्या देशात पिकणाऱ्या निळ्या तांदळाचे पीक घेण्याचा प्रयोग केला आहे. चिखलगावचे शेतकरी लहू फाले यांनी आपल्या शेतात निळा भात पिकवलाय. अगदी कमी कालावधीत हा भात तयार झाला असून या तांदळाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

3/9
मुळशी तालुक्यातील चिखलगाव येथील प्रयोगशील शेतकरी लहू फाले यांनी खरीप हंगामात निळ्या भाताची लागवड केली होती. त्याचा तांदूळ निळसर गडद जांभळ्या रंगाचा आहे. हा भात मलेशिया, थायलंड येथेच उत्पादित होतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे याला सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केला आहे. त्यामुळे बाजारात त्याला अधिक मागणी आहे.

4/9
सेंद्रिय निळा तांदूळ आरोग्यवर्धक असून यात लोह, झिंक, कॅल्शियम आणि भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असून हा तांदूळ कर्करोग मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी उपयोगी आहे. हृदयरोग आणि कर्करोगा सारख्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांसाठी गुणकारी आहे.

5/9
फाले यांनी मुळशी तालुक्यात हा पहिलाच प्रयोग केला आहे. यासाठी त्यांना तालुका कृषी अधिकारी हनुमंत खाडे तसेच कृषी सहाय्यक शेखर विरणक यांचे मार्गदर्शन लाभले. या भाताची उंची सात फुटांपर्यंत होते व तो 110 ते 120 दिवसांत काढणीसाठी तयार होतो.

6/9
भाताचे उत्पादन एक एकरात 1600 किलोपर्यंत होते. ह्या तांदळास प्रतिकिलो 250 रुपये बाजारभाव मिळतो. औषधी गुणधर्मामुळे भात खरेदी करण्यासाठी पुणे शहरातील ग्राहक मोठ्या प्रमाणात पसंती देतात.

7/9
पारंपरिक पद्धतीने भात लागवड न करता यांत्रिक पद्धतीने भात लागवड केली. यामुळे मनुष्यबळ देखील कमी प्रमाणात लागतं. सेंद्रिय पद्धतीने लागवड केल्याने उंची व उत्पादन मोठ्या प्रमाणात आलं आहे, अशी माहिती शेतकरी लहू फाले यांनी दिली.

8/9
इंडोनेशियाचं बियाणं आहे हे सर्व प्रथम अकोला या ठिकाणी आलं होत. हा बिजोत्पादन प्रक्रियेचा प्रयोग होता. आरोग्यासाठी हा तांदूळ चांगला आहे. खाण्यासाठी हा तांदूळ इंद्रायणी भाता सारखाच आहे.

9/9
10 गुंठे जागेमध्ये ही लागवड केली आहे. बाजारभाव याला चांगला मिळतो. ड्रायक्रोमाची पूर्णपणे बीज प्रक्रिया केली आहे. मॅट पद्धतीने मशीनने लागवड केली आहे. त्यानंतर हा तयार होतो, अशी माहिती कृषी सहायक अधिकारी शेखर विरणक यांनी दिली आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement