CIBIL Score: तुमचा CIBIL Score 800+ कसा करायचा? क्रेडिट कार्ड नसणाऱ्यांसाठी ७ स्मार्ट टिप्स!
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
CIBIL Score: क्रेडिट कार्डच्या भानगडीत कुठं पडता, या टिप्स वापरा आणि स्मार्ट बना! 800+ सिबिल स्कोअर कसा करायचा? सीक्रेट ट्रिक
तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नाही किंवा तुम्ही सध्या घ्यायचा विचारही केला नाही, पण हे ऐकलं आहे की क्रेडिट कार्ड असेल तर सिबिल स्कोअर पटापट वाढतो, तर तुम्ही क्रेडिट कार्ड न घेताही तुमचा सिबिल स्कोअर वाढवू शकता. कसा ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्यासाठी काही सोप्या पण सीक्रेट हॅक्स आहेत त्या वापरल्या तर तुम्हाला क्रेडिट कार्ड न घेताही चांगला सिबिल स्कोअर मेंटेन ठेवता येईल.
advertisement
क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला लोन पटकन मिळतं. क्रेडिट स्कोअर केव्हा चांगला होतो जेव्हा तुम्ही पेमेंट वेळच्या वेळी करता, तुम्ही कोणतीही थकबाकी ठेवत नाही, मुदतीआधी किंवा मुदतीपर्यंत पेमेंट करत असाल तर तुमच्या स्कोअर मेंटेन राहातो. मात्र तेच उशीर झाला तर स्कोअर खाली देखील घसरण्याचा धोका असतो. एकदा घसरलेला स्कोअर पुन्हा वर आणण्यासाठी कसरत करावी लागते. त्यासाठी तुम्हाला योग्य प्लॅनिंग करावं लागेल.
advertisement
क्रेडिट स्कोअर का महत्त्वाचा ते समजून घ्यावं लागेल. लोन मिळण्याची शक्यता वाढते. व्याजदर कमी लागण्याची शक्यता असते. क्रेडिट कार्डमुळे लिमिट जास्त मिळतं. बँक Low Risk Borrower मानते. सगळ्यात आधी तुम्ही छोटं लोन घ्यायला सुरुवात करा. तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकता. किंवा FD-backed Loan, Secured Loan सारख्या लोनचा वापर करू शकता. तुम्हाला एकही EMI मिस करायचा नाही. वेळेत भरायचा आहे.
advertisement
ई कॉमर्स किंवा बिल भरताना ऑनलाईन बँकिंगचा वापर करा. मोठ्या वस्तू खरेदी करताना त्या डेबिट कार्डवर EMI वर घेता येतात का त्यासाठी प्रयत्न करा. त्यामुळे तुमचा क्रेडिट प्रोफाइल रिपोर्ट तयार होईल. योग्य वेळी लोन भरल्याने क्रेडिट स्कोअर चांगला व्हायला मदत होईल. मोबाईल बिल, वायफाय, गॅस, इलेक्ट्रिसिटी बिल, रेंट ही सगळी बिलं ऑनलाईन भरायला सुरुवात करा आणि तारखेच्या आधी किंवा तारखेपर्यंत भरायला सुरुवात करा.
advertisement
advertisement
advertisement
क्रेडिट स्कोरपैकी ३५ टक्के भाग हा EMI वेळेवर भरण्यावर अवलंबून असतो. त्यामुळे EMI नेहमी वेळेत भरावी. यासाठी Auto-debit सेट करणे उत्तम. लेट फी लागू देऊ नका. तुमचा हा नियमित आणि स्वच्छ EMI रेकॉर्डच पुढे तुमची सर्वात मोठी ताकद बनतो. क्रेडिट स्कोर अचानक सुधारत नाही. हा हळूहळू, सातत्याने सुधारतो. पण जेव्हा सुधारतो तेव्हा तो स्थिर आणि मजबूत होतो.
advertisement


