Post Office Scheme: पत्नीच्या नावाने 100000 रुपये Post Office मध्ये गुंतवले तर 24 महिन्यात किती रिटर्न मिळतील?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
भारतीय डाकघराची टाइम डिपॉझिट योजना सुरक्षित गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे, १ ते ५ वर्षांसाठी ६.९ ते ७.५ टक्के व्याज मिळते आणि सरकारी संरक्षण मिळते.
आपल्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित असावं आणि कष्टाचा पैसा कुठेही न अडकता त्यावर खात्रीशीर परतावा मिळावा, असं प्रत्येकालाच वाटतं. विशेषतः जेव्हा आपण आपल्या पत्नीच्या नावाने काही बचत करू इच्छितो, तेव्हा सुरक्षिततेला आपण प्रथम प्राधान्य देतो. बाजारातील चढ-उतार किंवा गुंतवणुकीतील धोके पत्करण्यापेक्षा, भारतीय डाकघराची टाइम डिपॉझिट किंवा टीडी योजना हा एक अतिशय विश्वासार्ह पर्याय ठरतो. इथे तुमच्या पैशाला पूर्णपणे सरकारी संरक्षण असतं, त्यामुळे बँकांपेक्षाही जास्त सुरक्षिततेची भावना लोकांच्या मनात असते.
advertisement
advertisement
advertisement
पोस्टातील व्याजाचे दर पाहिले तर ते खरोखरच समाधानकारक आहेत. सध्या एक वर्षासाठी ६.९ टक्के, तर दोन वर्षांसाठी ७.० टक्के व्याज मिळते. तीन वर्षांच्या ठेवीवर ७.१ टक्के आणि पाच वर्षांच्या मुदतीवर सर्वाधिक ७.५ टक्के व्याज दिले जाते. विशेष म्हणजे, तुम्ही अगदी १००० रुपयांपासूनही या खात्याची सुरुवात करू शकता आणि गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नसल्याने तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कितीही रक्कम जमा करू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









