PPF की SIP, वर्षाला 1,50,000 रुपये जमा केले तर किती मिळतील?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
PPF आणि SIP, दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने दोन्ही योजना खूप चांगल्या मानल्या जातात. फरक फक्त इतकाच आहे की एक योजना निश्चित परतावा देणारी आहे आणि दुसरी योजना बाजारावर आधारित आहे. म्हणजे PPF मध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला सरकारकडून निश्चित व्याज मिळेल, तर SIP मध्ये गुंतवणूक केल्यास बाजाराप्रमाणे परतावा मिळेल.
advertisement
advertisement
PPF मधून करोडपती बनण्यासाठी तुम्हाला त्याचे एक्सटेंशन करावे लागेल आणि तेही 5-5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये 2 वेळा करावे लागेल. म्हणजे तुम्हाला PPF मध्ये ही गुंतवणूक 25 वर्षे चालू ठेवावी लागेल. 12,500 रुपये मासिक गुंतवणुकीनुसार 25 वर्षांत एकूण 37,50,000 रुपये तुम्हाला गुंतवावे लागतील आणि तेव्हा परिपक्वतेवर तुम्हाला 1,03,08,015 रुपये मिळतील. अशा प्रकारे 25 वर्षांत तुम्ही करोडपती बनू शकाल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जर तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करणार असाल, तर लक्षात ठेवा की बाजारावर आधारित परतावा असल्याने तो कमी किंवा जास्तही होऊ शकतो. येथे गणित अंदाजानुसार केले आहे. तसेच जर तुम्ही PPF निवडत असाल, तर लक्षात ठेवा की गुंतवणुकीसोबत एक्सटेंशन चालू ठेवण्यासाठी तुम्हाला परिपक्वतेच्या तारखेच्या 1 वर्षापूर्वी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये, जिथे खाते आहे, तिथे एक अर्ज द्यावा लागेल. एका वेळी तुमचे खाते 5 वर्षांसाठी एक्सटेंड होईल. पुन्हा एक्सटेंड करण्यासाठी पुन्हा अर्ज द्यावा लागेल.