वंदे भारतच्या मेन्यूमध्ये आता मिळणार खास पदार्थ! असेल स्थानिक टच
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
भारतीय रेल्वे आता वंदे भारत एक्सप्रेस गाड्या जलद आणि आरामदायी प्रवासापुरत्या मर्यादित ठेवत नाही. त्यांना भारताच्या सांस्कृतिक ओळखीशी जोडण्याचाही प्रयत्न करत आहे. यासाठी, आयआरसीटीसीने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. ज्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेसमधील प्रवाशांना वेगवेगळ्या राज्यांतील पारंपारिक आणि स्थानिक पाककृती दिल्या जातात. प्रवाशांना त्यांच्या डेस्टीनेशनवर जलद पोहोचता यावे यासाठीच नव्हे तर भारताच्या वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेता यावा, ज्यामुळे त्यांचा प्रवास संस्मरणीय होईल याची खात्री करणे हा यामागील उद्देश आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पूर्व भारताबद्दल बोलायचे झाले तर, हावडा पुरी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना ओडिशाचा प्रसिद्ध आलू फूलकोबी दिला जात आहे. पश्चिम बंगाल मार्गावरील वंदे भारत गाड्यांमध्ये प्रवाशांमध्ये कोशा पनीर, आलू पोतळ भाजा आणि मुरगीर झोल सारखे बंगाली पदार्थ अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. बिहारमधून निघणाऱ्या वंदे भारत गाड्यांमध्ये चंपारण पनीर आणि चंपारण चिकन सारखे पारंपारिक पदार्थ दिले जात आहेत.
advertisement
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, या उपक्रमामुळे प्रवाशांची संतुष्टी वाढेल आणि राष्ट्रीय स्तरावर भारतीय पाककृतींच्या विविधतेला चालना मिळेल. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रादेशिक पाककृतींचा समावेश झाल्यामुळे, रेल्वे प्रवास आता फक्त एक साधा प्रवास राहिलेला नाही, तर भारताच्या संस्कृती, चव आणि परंपरांशी जोडलेला एक अनोखा अनुभव आहे.






