नोकरी सोडून तरूणाने सुरू केला अनोखा कॅफे, नाशिकमध्ये हे आहे लोकेशन
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Mohan Najan
Last Updated:
नाशिकमधील एका तरुणाने आपल्या करिअरच्या शोधात अशीच एक अनोखी संकल्पना मांडली आहे. ज्यामध्ये आपण आपल्या खाण्याच्या आनंदासोबत आपल्या अंगी असलेल्या चित्रकलेच्या गुणांना लोकांसमोर प्रदर्शित करू शकतो.
advertisement
advertisement
advertisement
त्याचबरोबर त्याचा संगणक अभियांत्रिकी डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर तो लंडनमधील एका इंटीरियर कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. परंतु पूर्णवेळ हा कामात जात असल्याने आपल्या कलेला कुठे वाव मिळत नसल्याने आणि चित्रकलेकडे दुर्लक्ष करावे लागत असल्याने त्याने नोकरीसोडून व्यवसाय करण्याचे ठरविले. त्यानंतर त्याने नाशिकमध्ये असा एक कॅफे सुरू केला आहे.
advertisement
ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते चित्र रेखाटू शकता आणि सोबत स्वादिष्ट पदार्थांचा आस्वादही घेऊ शकता. आज असे बरेच लोक आहेत ज्यांना कला जोपासायला आवडते पण कदाचित त्यांच्याकडे कलाकृती साकारण्यासाठी वेळ किंवा जागा नाही त्यांच्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे. तुम्हाला कॅनव्हाससह पेंटिंगसाठी आवश्यक असलेली सर्व साधने आणि ती देखील सर्व काही मोफत उपलब्ध आहेत, तुम्हाला फक्त कॅनव्हाससाठी पैसे द्यावे लागतील.
advertisement
एवढेच नाही तर या कॅफेच्या वर असलेल्या त्याच्या बँक्वेट हॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करतो, जिथे तो वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती देखील शिकवतो. नाशिकमध्ये पहिल्यांदाच अशी वेगळी कल्पना घेऊन त्याने त्याचा हा व्यवसाय सुरू केला असल्याने कलाकार मंडळी त्याला चांगलाच प्रतिसाद देत आहेत. तसेच आपण काढलेले ते चित्र आपण इतर कुणाला आवडल्यास या ठिकाणी ते विक्री सुद्धा करू शकतो. जेणेकरून समोरच्याला देखील एक रोजगार मिळेल या हेतूने तो नेहमी प्रदर्शन देखील त्याच्या या कॅफेमध्ये भरवत असतो.
advertisement







