advertisement

अजित दादांच्या विमान अपघातापूर्वी विमानतळाची रेकी, रोहित पवारांचा खळबळजनक दावा

Last Updated:
बारामतीत अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात रोहित पवार यांनी घातपाताचा संशय व्यक्त करून CBI चौकशीची मागणी केली आहे. तपास यंत्रणांवरही प्रश्न उपस्थित केले.
1/7
बारामतीमध्ये झालेल्या अजित पवार यांच्या विमान अपघाताचे प्रकरण आता केवळ तांत्रिक बिघाडापुरते मर्यादित राहिलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात थेट 'रेकी' आणि घातपाताचा संशय पुन्हा एकदा व्यक्त केल्यानं राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे.

2/7
अपघाताच्या काही दिवसांपूर्वी काही लोक बारामती विमानतळाची रेकी करायला आले होते, असं स्थानिक लोक सांगतात, या संपूर्ण प्रकरणाची CBI कडून चौकशी व्हावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

3/7
रोहित पवार म्हणाले की,
रोहित पवार म्हणाले की, "स्थानिक लोकांशी चर्चा केल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली. अपघाताच्या काही दिवसांपूर्वी एक टीम बारामती विमानतळाची रेकी करण्यासाठी आली होती, असे लोकांचे म्हणणे आहे. हे लोक कोण होते? ते तिथे काय करत होते? हे सत्य शोधण्यासाठी आता CID किंवा CBI सारख्या तपास यंत्रणांची मदत घ्यावी लागेल." या संशयास्पद रेकीमुळे हा अपघात होता की घातपात, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
advertisement
4/7
रोहित पवारांनी केवळ रेकीच नाही, तर तपास यंत्रणांच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तपास यंत्रणांवर गंभीर आरोप करत त्यांनी थेट पुरावेच दिले.  २०२३ च्या विमान अपघातानंतर तपास पथकातील कर्मचाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली होती, मात्र अजित दादांच्या अपघातावेळी ही नावे का लपवण्यात आली आहेत?

5/7
व्ही. के. सिंग यांनी मुंबईतील अपघाताचे अवशेष स्वतः दिल्लीला नेल्याची माहिती मिळत आहे, ही बाब संशयास्पद वाटते. विमान प्रत्यक्षात ३००० तास जास्त चालले असतानाही, रेकॉर्डमध्ये 'अंडर लॉगिंग' करून ते कमी चालल्याचे दाखवण्यात आले, असा आरोपही पवारांनी केला आहे.

6/7
अपघातावेळी दृश्यमानता कमी असतानाही विमान उतरवण्याचा निर्णय का घेतला गेला? अनुभवी पायलटने नियमांचे उल्लंघन का केले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, या प्रकरणात मोठ्या लोकांच्या माध्यमातून कोणाला तरी वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला आहे.

7/7
रोहित पवार यांनी या प्रकरणात 'क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन' व्हावे आणि 'ॲरो'वर एफआयआर (FIR) दाखल करावा अशी मागणी केली आहे. केवळ अपघात पुन्हा होऊ नये इतपतच हा रिपोर्ट मर्यादित न ठेवता, त्यामागील गुन्हेगारी कट समोर येणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement