Smuggling Liquor : बंदी असलेल्या गुजरातमध्ये दारू तस्करीची नवीन शक्कल! मुंबईत आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Smuggling Liquor : रेल्वेतून दारूबंदी असलेल्या गुजरात राज्यात तस्करी करणाऱ्यांना बोरिवली पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. (विजय वंजारा, प्रतिनिधी)
गुजरातमध्ये दारूबंदी असतानाही दारुची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. अशाच प्रकारे मुंबईच्या बोरिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंतरराज्यीय टोळीकडून गुजरात, भरूच येथे विविध ब्रँडची दारू पाठवली जात असल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बोरीवली एस. वी. रोड येथे सापळा रचून 4 दारू तस्करांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून मद्याच्या बॉटल देखील हस्तगत केल्या आहेत.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोरिवली एस, व्ही. रोड परिसरातील काही वाईन शॉपमधून ब्रँडेड कंपन्यांची दारू मोठ्या प्रमाणावर गुजरात भरुच येथे पाठविली जाणार असल्याची माहिती बोरिवली पोलिसांना मिळाली. यासाठी चार तरुण गुजरात येथून मुंबई बोरिवली येथे येऊन ते रेल्वेने अवैधरित्या ब्रँडेड कंपन्यांची दारू घेऊन जाणार होते. मागील अनेक दिवसांपासून ही आंतरराज्य टोळी बोरिवली येथून गुजरातला दारू घेऊन जात असल्याचे समजल्याने पोलीस देखील या टोळीवर लक्ष ठेवून होते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement