शनिवारी पहाटे 2.10 मिनिटांनी तर हार्बरवरुन सुटणार 3 वाजता 12 विशेष लोकल, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे ६ डिसेंबरला दादर चैत्यभूमीसाठी १२ विशेष लोकल चालवणार, प्रवाशांसाठी रात्रीची सोय उपलब्ध.
6 डिसेंबर ही तारीख फार महत्त्वाची आहे. या दरम्यान मध्य रेल्वे विशेष लोकल चालवणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी येत असतात. या लाखो बांधवांच्या सोयीसाठी आणि वाढत्या गर्दीचे नियोजन योग्य प्रकारे व्हावे यासाठी मध्य रेल्वेने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
advertisement
प्रवाशांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने एकूण १२ 'विशेष लोकल' चालवण्याची व्यवस्था केली आहे. हा निर्णय चैत्यभूमीवर रात्री-अपरात्री येणाऱ्या सर्व अनुयायांसाठी मोठा दिलासा देणारा आहे. मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या या विशेष लोकल शुक्रवार, ५ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर 6 डिसेंबरच्या पहाटे धावणार आहेत.
advertisement
या गाड्या मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर चालवण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाने सर्व अनुयायांना नम्र आवाहन केले आहे की, त्यांनी या विशेष गाड्यांमधून प्रवास करताना प्रवासाचे तिकीट घेऊनच प्रवास करावा. दादरच्या दिशेने येणाऱ्या आणि दादरहून परतणाऱ्या अनुयायांसाठी मुख्य मार्गावर ६ विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत
advertisement
पहिली लोकल पहाटे 2.10 मिनिटांनी सुटेल ही लोकल ठाणे ते परळ असणार आहे. तर कुर्लो ते परळ रात्री 11.45 मिनिटांनी विशेष लोकल सुटणार आहे. कल्याण ते परळ दरम्यान मध्यरात्री १.०० वाजता लोकल सुटेल. डाऊन मार्गावर परळ ते ठाणे दरम्यान मध्यरात्री १.१५ वाजता तर परळ ते कल्याण दरम्यान मध्यरात्री २.३० वाजता लोकल सुटणार आहे. परळ ते कुर्ला दरम्यान मध्यरात्री ३.०५ वाजता सुटेल.
advertisement
नवी मुंबई आणि पनवेलच्या बाजूने येणाऱ्या अनुयायांसाठी हार्बर मार्गावरही एकूण ६ विशेष लोकलची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्या कुर्ला स्टेशनच्या माध्यमातून जोडल्या जातील. अप मार्गावर वाशी ते कुर्ला: मध्यरात्री १.३० वाजता, पनवेल ते कुर्ला: मध्यरात्री १.४० वाजता, वाशी ते कुर्ला: मध्यरात्री ३.१० वाजता लोकल सुटेल
advertisement
advertisement


