Cyclone Shakhti: महाराष्ट्राच्या दिशेनं येतंय चक्रीवादळ, काय होणार परिणाम? हवामान खात्याचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ पाहिला मिळाला. सध्या चक्रीवादळाचे मोठे संकट घोंगावत आहे.
advertisement
यंदाचे पहिले चक्रीवादळ अरबी समुद्रात सक्रिय झाले आहे. श्रीलंकेने चक्रीवादळला शक्ती हे नाव दिले आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने या चक्रीवादळाबाबत संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे. IMD नुसार, किनारपट्टीवर 100 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसादरम्यान घराबाहेर न पडण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
IMD च्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र सरकारने सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाला तातडीने सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय करण्यासोबतच, पूर येण्याची शक्यता असलेल्या भागांत नागरिकांना हलवण्याची तयारी पूर्ण ठेवण्याचे आणि जनतेपर्यंत वेळोवेळी आवश्यक माहिती पोहोचवण्याचे सांगण्यात आले आहे. समुद्रात असलेल्या सर्व नौकांना तातडीने किनाऱ्यावर परतण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
advertisement