Maharashtra Election 2024: मशाल पेटणार की लाडकं सरकार पुन्हा येणार? कुणाचा होणार करेक्ट कार्यक्रम?

Last Updated:
महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये 4 नोव्हेंबर ही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी महत्त्वाची तारीख ठरणार आहे.
1/5
अखेर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.  २० नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. पण यंदाची निवडणूक ही सत्ताधारी आणि विरोधकांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची असणार आहे. दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी अशी अवस्था पवार आणि ठाकरे यांच्या पक्षाची झाली आहे. त्यामुळे जनता कुणाला मतदान करणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे भाजपसाठी लोकसभेचा पेपर अवघड गेला होता. त्यामुळे विधानसभेला किती जागा मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

advertisement
2/5
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकींच्या तारखांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रात यंदा फक्त एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात 288 जागांसाठी निवडणूक होईल तर 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागतील. 29 ऑक्टोबर ही निवडणूक अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, तर 30 ऑक्टोबरला उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. 4 नोव्हेंबर ही निवडणूक अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस आहे.

3/5
महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख पक्ष आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे पक्ष आहेत. या मोठ्या पक्षांसह महाराष्ट्रात तिसरी आघाडीही तयार झाली आहे. तसंच वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि मनसेचंही आव्हान आहे. इतक्या छोट्या-मोठ्या पक्षांसह बंडखोरही निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर विजयी उमेदवार अत्यंत कमी मार्जिननी निवडणूक जिंकण्याची शक्यता आहे, त्यामुळे बंडखोरांना रोखण्याचं आव्हान सगळ्याच राजकीय पक्षांसमोर असणार आहे.

4/5
विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत. शिवसेना शिंदे गटाने जागावाटपात 107 जागा मागितल्या आहेत. मात्र, त्यांना 80 ते 85 जागा देण्याबाबत भाजप तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, शिवसेना शिंदे गटाला किमान 90 ते 95 जागा भाजपकडून सोडण्यात येतील असा विश्वास त्यांच्या नेत्यांना असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

5/5
महाविकास आघाडीमध्येही उद्धव ठाकरेंच्या शिवेसनेने 140 जागांची मागणी केल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या या मागणीनंतर काँग्रेसचे नेते सोमवारी दिल्लीत हायकमांडला भेटायला गेले होते. या बैठकीत जागा वाटप आणि मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय निवडणुकीनंतर होईल, असं राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या काँग्रेस नेत्यांना सांगितल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement