Weather Alert: मुंबई-ठाणेकर स्वेटर सोडा, आता AC जोडा, कोकणात पारा चढला, रविवारचं हवामान अपडेट

Last Updated:
Weather Alert: नोव्हेंबर अखेर राज्यात गारठवा वाढला आहे. मुंबई-ठाण्यात मात्र हवामानात मोठे बदल जाणवत असून तापमानात वाढ झाली आहे.
1/5
गेल्या आठवडाभरात कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी थंडी जाणवत होती तर काही भागात ती फारशी टिकली नाही. आजही हीच स्थिती कायम राहणार आहे. काही जिल्ह्यांत सकाळच्या वेळी गारवा जाणवत असला तरी दिवसा तापमानात साधारण 1–2 अंशांनी वाढ झाली आहे. आकाश बहुतेक भागांत स्वच्छ असून हवा कोरडी आहे. त्यामुळे थंडीच्या काळात उन्हाचे चटके आणि घामाच्या धारा सहन कराव्या लागत आहेत. मुंबईसह कोकणातील आज 30 नोव्हेंबरचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/5
मुंबईत आज पुन्हा उष्णतेचे प्रमाण जाणवणार आहे. सकाळी तापमान साधारण 22 अंशांवर असून कालच्या तुलनेत यात काहीही घट दिसत नाही. दिवसा मात्र तापमान 33 ते 34 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून हे तापमान शनिवारपेक्षा किंचित वाढलेलेच आहे. मुंबईत सकाळ-संध्याकाळचा गारवा जवळजवळ पूर्णपणे कमी झाल्यामुळे शहरात दिवसभर ऊन आणि उकाडा जाणवेल. हवा कोरडी राहील.

3/5
नवी मुंबई आणि ठाण्यात आजचे हवामान मुंबईसारखेच राहील. या दोन्ही ठिकाणी सकाळचे तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असून कालपेक्षा फारसा बदल जाणवनार नाही. दिवसा तापमान 33 ते 34 अंशांदरम्यान जाऊ शकते, जे एक अंशाने वाढलेले जाणवेल. हवा पूर्णपणे कोरडी राहील आणि थंडीचा जोर देखील कमीच जाणवेल.

4/5
पालघर जिल्ह्यात आज सकाळी थोडासा गारवा जाणवू शकतो, कारण येथे किमान तापमान 20 ते 21 अंशांच्या आसपास असून त्यात शनिवारच्या तुलनेत किंचित घट दिसते. मात्र दिवसा हवामान उष्ण राहील आणि तापमान 32 ते 33 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात थंडी पहाटेच जाणवेल, दिवसभर वातावरण कोरडे आणि उबदारच राहणार आहे.

5/5
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दक्षिण कोकणातील जिल्ह्यांतही तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. सकाळी तापमान 21 ते 22 अंशांच्या आसपास असून काही ठिकाणी यात किंचित घट दिसत असली तरी मोठा फरक नाही. दिवसा मात्र तापमान 32 ते 33 अंशांदरम्यान राहील आणि ते कालपेक्षा वाढलेले असेल. समुद्रकिनारी पहाटे गारवा जाणवत असला तरी दिवसा त्याचा परिणाम राहात नाही. या तिन्ही जिल्ह्यांत आज उबदार आणि कोरडे हवामानच राहील.

BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement