Konkan Red Alert: धोक्याची घंटा! मुंबई, ठाण्यात अतिवृष्टी होणार, कोकणावर संकट, 48 तासांसाठी रेड अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत असून पुढील 2 दिवस अतिवृष्टीची शक्यता आहे. हवामान विभागाने 48 तासांसाठी मुंबईसह ठाणे आणि संपूर्ण कोकणात हायअलर्ट जारी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम आहे. शनिवारी दिवसभर कोसळलेल्या मुसळधार सरींनंतर आज, 28 सप्टेंबर रोजीदेखील हवामान विभागाने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघरला रेड अलर्ट दिला आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण कोकणात मुसळधार पावसाचा जोर कायम असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
advertisement
शनिवारी दिवसभर पावसाने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईला झोडपून काढले होते. आजही हीच परिस्थिती कायम राहणार आहे. आज मुंबई ठाणे नवी मुंबई या भागांत रेड अलर्ट आहे. आज सकाळपासूनच अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढेल. त्यामुळे वाहतूक कोंडी, पाणी साचणे आणि लोकल ट्रेन सेवेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
advertisement
पालघर जिल्ह्यात आज रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. ग्रामीण भागात आणि किनारपट्टीवर मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत कोसळणाऱ्या सरींमुळे काही नद्या ओसंडू लागल्या आहेत. प्रशासनाने खबरदारी म्हणून नागरिकांना अनावश्यक घराबाहेर पडू नये, तसेच समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
advertisement







