Mumbai Rain: कोकणात वारं फिरलं, मुंबई-ठाण्याला पुन्हा अलर्ट, पाहा आजचा हवामान अंदाज
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Rain: गेल्या काही दिवसांत मुंबईसह उपनगरांत पावसानं थैमान घातलं. आता कोकणातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत.
गेल्या चार दिवसांपासून पावसाने कोकण किनारपट्टीसह मुंबईत अक्षरशः थैमान घातलं आहे. मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. तर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसामुळे नद्या धोक्याच्या पातळीवर आहेत. समुद्राला मोठी भरती असल्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
advertisement
मुंबईत गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे कुर्ला, भांडुप, दहिसर, माटुंगा अशा अनेक भागांमध्ये पाणी साचले असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून लोकल गाड्या उशिराने धावतात आहेत तर काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या. आज पुन्हा पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस शहरात आणि उपनगरांमध्ये पडेल. मात्र काही भागांत अचानक जोरदार सरींचा धोका आहे.
advertisement
advertisement
advertisement
कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला गेला आहे. दोन्ही जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडतील. डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका कायम असून नद्यांच्या पातळीत वाढ होऊ शकते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र आज हलका पाऊस होणार आहे. आकाश ढगाळ राहील, तापमान 25°C ते 30°C दरम्यान राहील. समुद्राला थोडी भरती असल्यामुळे मच्छीमारांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.









