Weather Alert: पावसाची उघडीप, ठाणे-मुंबईकरांवर नवं संकट, कोकणातील हवामानात आजपासून मोठे बदल

Last Updated:
Weather Alert: ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कोकणात पावसाने उघडीप घेतली असली तरी आता नैगरिकांना नव्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
1/5
गेल्या काही आठवड्यांपासून कोकण किनारपट्टी आणि मुंबई परिसरात झालेल्या सलग पावसानंतर आता हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला रिमझिम ते मध्यम सरींनी हजेरी लावली असली तरी, आज पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

advertisement
2/5
ऑक्टोबरच्या सुरुवातीला पावसाने थोडी हजेरी लावली असली तरी आता हवामान स्थिर झाले आहे. मुंबईत आज वातावरण शांत राहील. आकाश ढगाळ असले तरी पावसाचा कोणताही अंदाज नाही. सकाळपासून हलका गार वारा असून दुपारनंतर उकाडा जाणवेल. आजचे कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस आणि किमान 26 अंश सेल्सिअस असेल. वाऱ्याचा वेग 10-12 किमी प्रतितास राहील.

3/5
ठाणे व नवी मुंबई परिसरातही आज पावसाची शक्यता नाही. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसानंतर हवामान स्थिर झाले आहे. आकाश किंचित ढगाळ राहील, पण दिवसभर कोरडे वातावरण असेल. तापमान 27 ते 32 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर दमट हवेमुळे उकाडा जाणवेल.

4/5
पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून हवामान स्वच्छ असून ढगाळ वातावरण आहे. पावसाचा कोणताही अलर्ट नाही. ग्रामीण भागात थोडी आर्द्रता असून वातावरण उकाड्याचे राहील. तापमान 26 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान आणि वाऱ्याचा वेग सुमारे 10 किमी प्रतितास राहील.

5/5
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टीवरील या तिन्ही जिल्ह्यांत ऑक्टोबर महिन्याची सुरुवात हलक्या सरींनी झाली होती. मात्र आज पाऊस थांबला असून आकाश स्वच्छ दिसत आहे. किनाऱ्यांवर हलकी वारे वाहतील, आणि वातावरणात ओलावा कायम राहील. आजचे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस, तर वाऱ्याचा वेग 12-15 किमी प्रतितास इतका नोंदवला जाईल.

Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement