Mumbai Weather: एप्रिलअखेर मुंबईवर दुहेरी संकट, दुपारी घरातच थांबा, हवामान विभागाने दिला अलर्ट

Last Updated:
Mumbai Weather: एप्रिलअखेर मुंबईतील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. येत्या आठवड्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
1/5
राज्यासह मुंबईतील हवामानात एप्रिलअखेर मोठे बदल जाणवत आहेत. मुंबईसह उपनगरांत उष्णतेचा पारा चढला असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. पुढील 24 तासांचा तापमान आणि हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/5
आज कमाल तापमान 38 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. हवेमध्ये सौम्य उत्तर-पूर्व दिशेने वारे 9.3 किमी/तास वेगाने वाहणार आहेत. आठवड्याच्या उत्तरार्धात उष्णतेची तीव्र लाट (Heatwave) जाणवेल.

3/5
दक्षिण मुंबईत तापमान 38-39 अंश सेल्सिअस, ठाणे येथे 42 अंश, नवी मुंबईत 41 अंश, आणि कल्याणमध्ये तब्बल 44 अंश सेल्सिअस होण्याची शक्यता आहे. उत्तर कोकणातील काही भागांतही तापमान 44 अंशाच्या पुढे जाऊ शकते.

4/5
आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे मंगळवार आणि बुधवारी किमान तापमान 27 अंश सेल्सिअस असेल. गुरुवारी थोडी घट होऊन 26 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरेल. शुक्रवार व शनिवार 27 अंश सेल्सिअस, तर रविवार व सोमवार 26 अंश सेल्सिअस राहील. यामुळे रात्रीच्या वेळी थोडेसे गार वाटण्याची शक्यता आहे, परंतु दिवसा उष्णता तीव्र राहणार आहे.

5/5
सध्या मुंबईतील हवामान गुणवत्ता निर्देशांक (AQI) PM10 साठी 146 इतका आहे, जो 'मध्यम' श्रेणीत मोडतो. सफर-इंडिया यांच्या मते, 100 ते 200 दरम्यानचा AQI मध्यम असतो आणि या परिस्थितीत संवेदनशील व्यक्तींनी (जसे की लहान मुले, वृद्ध व्यक्ती, श्वसनाचे विकार असलेले रुग्ण) विशेष काळजी घ्यावी. शक्य असल्यास प्रदूषण जास्त असलेल्या भागांमध्ये वावरणे टाळावे.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement