1-2 की 3 एका व्यक्तीकडे किती बँक अकाउंट असायला हवेत? एक्सपर्टनी थेट सांगितलं
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, सॅलरी अकाउंट आणि जॉइंट अकाउंट उपलब्ध आहेत. RBI ने खात्यांची संख्या मर्यादित केलेली नाही, पण तीनपेक्षा जास्त खाती सांभाळणे कठीण.
बऱ्याचदा आपल्याकडे एकच बँक अकाउंट असतं. किंवा काही जणांकडे एकापेक्षा जास्त अकाउंट देखील असतात. या दोन्ही लोकांना अनेक प्रॉ़ब्लेम येतात, ज्यांच्याकडे आहे त्यांना ते सांभाळून ठेवायला नाही त्यांना व्यवहार करताना अडचणी भासतात. मग अशावेळी नक्की करायचं काय? नेमकी किती खाती असायला हवीत, त्याचे फायदे काय आहेत, किती प्रकारचे बँक अकाउंट असतात याबाबत सोप्या शब्दात समजून घेऊया.
आजच्या काळात पैशांची सुरक्षितता आणि व्यवहारांची सोय यासाठी सर्वप्रथम बँक खात्याचाच विचार मनात येतो. लहान व्यवहार असो की मोठे, बँक खाते आपल्या दैनंदिन आर्थिक व्यवहाराचा अविभाज्य भाग बनले आहे. मात्र प्रश्न असा आहे की, एका व्यक्तीकडे किती बँक खाते असणे योग्य ठरेल ग्राहकांच्या गरजेनुसार बँका विविध प्रकारची खाती उपलब्ध करून देतात. यात सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, सॅलरी अकाउंट आणि जॉइंट अकाउंट यांचा समावेश होतो.
advertisement
सेव्हिंग अकाउंट : बहुतेक लोक बचतीसाठी हे खाते उघडतात. यात प्रत्येक महिन्यात काही रक्कम जमा केली जाते आणि त्यावर व्याजही मिळतं. सेविंग अकाउंट हे दैनंदिन खर्चासाठी आणि बचतीसाठी वापरलं जातं. एका व्यक्तीचे एकापेक्षा जास्त सेविंग अकाउंट असू शकतात.
जॉइंट अकाउंट : हे खाते एकाच बँकेत दोन व्यक्तींच्या नावाने उघडले जाते.काही वेळा अल्पवयीन मुलाच्या पालकाशी मिळून खाते उघडले जाते. तर पती-पत्नीही हे जॉइन्ट खाते चालवतात. प्रायमरी खातं आणि सेकंडरी खातं असे दोन अकाउंट होल्डर मिळून एकच अकाउंट चालवतात. मोठ्या व्यवहारांसाठी प्रायमरी अकाउंट होल्डरची आवश्यकता भासते.
advertisement
करंट अकाउंट : प्रामुख्याने व्यापारी, व्यावसायिक आणि मोठ्या व्यवहारासाठी हे खाते वापरले जाते.
सॅलरी अकाउंट काय असते?
सॅलरी अकाउंट हे कंपनीकडून उघडलं जातं. खासगी किंवा सरकारी कंपनीत नोकरी करणाऱ्यांसाठी सॅलरी अकाउंट घडलं जातं. यासाठी कंपन्यांचा बँकेशी करार असतो. विशेष म्हणजे तुम्हाला या खात्यात किमान रक्कम ठेवण्याची आवश्यकता नाही. कारण, या खात्यात दरमहा पगार येतो.
advertisement
किती बँक अकाउंट असायला हवेत?
आता प्रश्न असा आहे की तुमच्याकडे किती बँक खाते असायला हवेत? याबाबत RBI ने कोणतीही बंधन घातलेली नाहीत. एक व्यक्ती एकापेक्षा जास्त बँकेत खाती उघडू शकते. ती किती उघडावीत याबाबत कोणताही नियम नाही. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तीन किंवा त्यापेक्षा जास्त खाते उघडणं फायनान्शियली जास्त कठीण असतं. तीनपेक्षा जास्त बचत खाती ठेवणे ही समस्या असू शकते. कारण, पगार खाते वगळता, इतर सर्व खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवावी लागते. अशा परिस्थितीत, तीनपेक्षा जास्त बँक खाती उघडताना, वेळोवेळी त्या खात्यांमध्ये तसेच आर्थिक व्यवहारांमध्ये किमान शिल्लक असणे आवश्यक आहे. जर असे केले नाही तर, बँक खाते इनअॅक्टिव्ह करते. ते पुन्हा सुरू करण्यासाठी बरीच प्रक्रिया या दंड भरावा लागतो. त्यामुळे हे टाळायचे असेल तर आवश्यक तेवढीच खाती उघडावीत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 08, 2025 11:49 AM IST