Population Day 2025: मुंबईवर आणखी किती ओझं टाकणार? माणसं जगणार कशी? नवीन आकडेवारी समोर

Last Updated:
Population Day 2025: देशाची आर्थिक राजधानी आणि ‘भारताचे न्यूयॉर्क’ म्हणून ओळखली जाणारी मुंबई आता स्वतःच्या क्षमतेवर ताण सहन करत आहे.
1/7
देशाची आर्थिक राजधानी आणि ‘भारताचे न्यूयॉर्क’ म्हणून ओळखली जाणारी मुंबई आता स्वतःच्या क्षमतेवर ताण सहन करत आहे. 2011 मध्ये 1.8 कोटी लोकसंख्या असलेली मुंबई, 2025 मध्ये तब्बल 2.20 कोटी लोकांच्या जगण्याचे केंद्र बनली आहे. ही संख्या मुंबई महानगर क्षेत्राच्या नैसर्गिक क्षमतेपेक्षा 3 पट अधिक आहे. आज जागतिक लोकसंख्या दिन आहे. याच निमित्ताने आपण 2011 ते 2025 या कालावधीत मुंबईतील घरांच्या किमती आणि पायाभूत सुविधांबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.

advertisement
2/7
मुंबईत 2024 मध्ये 2.16 कोटी असलेली लोकसंख्या अवघ्या एका वर्षात 1.92 टक्क्यांनी वाढून 2.20 कोटी झाली आहे. ही वाढ दरवर्षी होणारी असून, मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक, घरबांधणी, पाणीपुरवठा, आणि वाहतूक व्यवस्था या सर्वांवर अमानवी ताण निर्माण झाला आहे.

3/7
2011 मध्ये 30 लाखांत मिळणारा फ्लॅट, आज 1.02 कोटी रुपये मोजल्याशिवाय शक्य नाही. मागील दशकात घरांच्या किमतींमध्ये 54 टक्के वाढ झाली आहे. सध्या सरासरी 1 BHK चा दर 1 कोटीच्या पुढे आहे, 2 BHK साठी 2.7 कोटी, आणि 4 BHK साठी तब्बल 9 कोटी रुपये मोजावे लागतात. मुंबईतील चौरस फूट दर सध्या 26, 975 रुपये आहे – जो देशातील सर्वाधिक आहे. हा दर मुंबईतील उंच इमारतींचा आहे. मुंबईतील झोपडपट्टी भागातील दरही गगनाला भिडेल असा आहे. त्यामुळे सामान्य माणसांसाठी मुंबईत घर ही स्वप्नवत झाली आहे.

4/7
मुंबईत वाढती लोकसंख्या यामुळे मुंबईतील घरांच्या किंमतींवर परिणाम तर झालाच आहे. पण या लोकसंख्येचा परिणाम या इतर महत्त्वाच्या गोष्टींवरही झालाय. मुंबई लोकल जिला मुंबईची लाइफ लाईन म्हणतात. तिच्या प्रवासी क्षमतेपेक्षा 4 पट अधिक लोक दररोज प्रवास करतात. तसेच, मुंबईतील रस्त्यांवर असलेली वाहने शहराच्या वाहन क्षमतेपेक्षा 2 पट अधिक आहेत. यामुळे वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.

5/7
‘हम दो, हमारे दो, तिसरा हो गया तो मुंबई भेज दो’ अशी म्हणच मुंबईच्या बाबतीत प्रचलित झाल्याचे दिसतेय. देशभरातून रोज नवे तरुण ‘मुंबई पोटाला खायला देते’ या आशेने शहरात दाखल होत आहेत. मात्र, रोजगाराची उपलब्धता आणि घरांचा अभाव यामुळे झोपडपट्ट्यांची संख्या वाढते आहे. मुंबईत जवळपास 40 टक्के जनता झोपडपट्ट्यांमध्ये राहते.

6/7
सात बेटांपासून सुरू झालेल्या मुंबईने पोर्तुगीज, इंग्रज आणि स्वातंत्र्यलढ्यातून वाटचाल करत आर्थिक राजधानीपर्यंतचा प्रवास केला. पण आज ही मुंबई लोकसंख्या आणि विकास नियोजनाच्या अतिरेकाने गुदमरत आहे. 1906 मध्ये जिथे मुंबईची लोकसंख्या 10 लाख होती, आज तिथे 2 कोटींहून अधिक लोक राहतात – आणि भविष्यात हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.

7/7
शहराच्या पायाभूत सुविधांची दुरवस्था, वाढती लोकसंख्या, महाग घरबांधणी, आणि प्रदूषणाच्या संकटात मुंबई अडकली आहे. आता गरज आहे दृष्टिकोन बदलण्याची, शाश्वत नियोजनाची आणि लोकसंख्या नियंत्रणाची. अन्यथा, ‘स्वप्नांची नगरी’ असलेली मुंबई भविष्यात केवळ गर्दी, गोंधळ आणि गुदमरलेल्या श्वासांचं शहर बनून राहील.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement