WhatsAppवर डिलीट केलेले मेसेज कसे वाचायचे? थर्ड पार्टी अॅपचीही गरज नाही, ही आहे Trick
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
सध्याच्या काळात सर्वच लोक व्हॉट्सअॅप वापरता. व्हॉट्सअॅपवर चॅट करताना कोणी पाठवलेला मेसेज डिलीट केला तर आपल्याला उत्सुकता असते की, त्याने डिलीट केलेला मेसेज काय आहे. पण ते आपल्याला वाचताच येत नाही. हेच वाचायची सोपी ट्रिक आपण आज पाहणार आहोत.
advertisement
advertisement
कोणी व्हॉट्सअॅप मेसेज पाठवतो आणि नंतर 'Delete for Everyone' वर क्लिक करतो, तेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या चॅट बॉक्समध्ये 'This message was deleted' असा मेसेज येतो. हे फीचर यूझर्सच्या प्रायव्हसीसाठी डिझाइन केलेले आहे. परंतु ते अनेकदा रिसिव्हरसाठी त्रासदायक ठरू शकते. आता, तुम्ही डिलीट केलेले व्हॉट्सअॅप मेसेज कसे वाचू शकता ते पाहूया.
advertisement
advertisement
यासाठी, तुम्हाला अँड्रॉइड 11 किंवा त्यावरील व्हर्जनवर चालणारा अँड्रॉइड फोन आवश्यक आहे. अँड्रॉइडमध्ये 'नोटिफिकेशन हिस्ट्री' नावाचे फीचर आहे जे तुमच्या फोनवर येणाऱ्या नोटिफिकेशन सेव्ह करते. तुम्हाला व्हॉट्सअॅप मेसेजचे नोटिफिकेशन मिळाले आणि नंतर ते डिलीट केले. तर तुम्ही त्याचा मजकूर नोटिफिकेशन हिस्ट्रीमध्ये पाहू शकता. कारण, नोटिफिकेशन हिस्ट्री चालू असताना, नोटिफिकेशन म्हणून येणारा प्रत्येक व्हॉट्सअॅप मेसेज तुमच्या फोनवर सेव्ह केला जातो. पाठवणाऱ्याने नंतर मेसेज डिलीट केला तरीही, तुम्हाला नोटिफिकेशनमधील कंटेंट पाहता येतो.
advertisement
advertisement










