महायुतीच्या जागांचा तिढा सुटेना, पण काँग्रेसची गाडी मात्र सुस्साट! 12 तासात दुसरी यादी जाहीर

Last Updated:

सोलापूर आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून चेतन नरोटे यांना तिकीट मिळाले. महायुतीत अजूनही जागा वाटप ठरलेले नाही.

News18
News18
प्रीतम पंडित, सोलापूर: महायुतीचा काहीच ठरेना अशी परिस्थिती झाली आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली आणि पुण्यात मात्र आता युतीच्या जागा वाटपाचा तिढा आणखी कठीण होत चालला आहे. जागा वाटपावरुन धुसफूस चालली असतानाच काँग्रेस मात्र पुन्हा एकदा सुस्साट चालली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं. आता महानगरपालिकेसाठी पुन्हा एकदा कंबर कसली असून आपल्या कसलेल्या आणि जुन्या शिलेदारांवर विश्वास ठेवला आहे.
काँग्रेसने 12 तासांत आता दुसरी यादी जाहीर केली आहे. कोल्हापूर पाठोपाठ आता सोलापुरातील उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसची पहिली यादी जाहीर करण्यात आली. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेसने सर्वात प्रथम आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. महायुतीचं अजूनही ठरत असताना आणि इतर पक्षांची उमेदवारी जाहीर होण्याआधीच काँग्रेसने पहिली यादी जाहीर करून आपला नंबर लावला.
advertisement
काँग्रेस कडून पहिल्यांदी 20 जणांची यादी जाहीर करण्यात आली. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना 15 प्रभागातून तिकीट देण्यात आलं. काँग्रेसने जुन्याच सहकाऱ्यावर विश्वास ठेवत उमेदवारी दिली. सोलापूर महानगरपालिका काँग्रेस मित्र पक्षांसोबत लढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
काँग्रेसने कोल्हापूर महानगर पालिकेतील 48 उमेदवारांची यादी शुक्रवारी रात्री उशीरा जाहीर केली. राज्यात होणाऱ्या मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीर झालेली ही पहिलीच यादी आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य निवड मंडळाची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
advertisement
या बैठकीत खासदार शाहूजी छत्रपती महाराज, विधानपरिषदेतील गटनेते जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार व आमदार जयंत आसगांवकर माजी आमदार मालोजीराजी छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महायुतीच्या जागांचा तिढा सुटेना, पण काँग्रेसची गाडी मात्र सुस्साट! 12 तासात दुसरी यादी जाहीर
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement