कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाने निष्पाप बळी! सांडपाणी प्रकल्पाच्या खड्ड्यात आजी- नातवाचा दुर्दैवी मृत्यू

Last Updated:

कंत्राट दाराच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आजी नातवाला आपला जीव गमवावा लागला आहे. संबंधित कंत्राटादारावर सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

AI image
AI image
कंत्राट दाराच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आजी नातवाला आपला जीव गमवावा लागला आहे. जालन्यात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या पाईपलाईनच्या खड्ड्यात पडून जनाबाई खरात आणि राज खरात यांचा दुर्दैवीअंत झाला. संबंधित कंत्राटादारावर सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनाबाई खरात या नातवासोबत जळतन आणण्यासाठी कुंडलिक नदीपात्रात उतरल्या होत्या. सांडपाणी कुंडलिका नदी पात्रात सांडपाणी प्रक्रिया प्लांटसाठी पाईपलाईन खड्डा खोदण्यात आला होता.
खड्यात दोघेही कोसळल्याने त्यांचा करूण अंत झाला आहे. खड्यात शेवाळ असल्याने बराच वेळ मृतदेह दिसून येत नव्हते. गळ टाकून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. जालना शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया होण्यासाठी कुंडलिका नदीच्या रोहनवाडी पुलाजवळ प्रकल्प होत आहे. या प्रकल्पासाठी नदी पात्रात दोन्ही बाजूंनी पाइप लाइनसाठी खोदकाम केले आहे. परंतु, अनेक दिवसांपासून हे काम झालेले नाही. त्यामुळे पाइप लाइनमध्ये पाणी साचले होते.
advertisement
पाईप लाईनसाठी केलेल्या खोदकामामध्ये, बुडून काही महिन्यांपूर्वी एका तरुणाचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा आजी-नातवाचा मृत्यू झाला. मृतदेह सापडलेले आजी आणि नातू हे शहरातील लोधी मोहल्ला भागातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलि‍सांनी घटनेचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवून शवविच्छेदन करण्यात आले आहे. या प्रकरणात नोंद घेण्यात आली आहे. सदर घटनेचा पुढील तपास सदर बाजार पोलिसांकडून केला जात आहे. घाणेवाडी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे कुंडलिका नदीपात्रात अजूनही पाणी आहे.
advertisement
दरम्यान, पात्रात पाइपलाइन‌साठी खोदकाम करण्यात आल्याने यात पाणी साचले आहे. अनेक दिवसांपासून पाणी असल्याने या पाण्यावर पूर्णपणे शेवाळ झाले आहे. आजी-नातू पाण्यात पडले असताना शेवाळामुळे कुणाला दिसले नाही. रात्री उशिरा पाण्यात गळ टाकून शोध घेतल्यानंतर मृतदेह सापडले
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाने निष्पाप बळी! सांडपाणी प्रकल्पाच्या खड्ड्यात आजी- नातवाचा दुर्दैवी मृत्यू
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement