photos : जमिनीपासून 10 हजार फूट उंचीवर आहे हे पोलीस ठाणे, वर्षातून उघडते फक्त 5 महिने, Location काय?

Last Updated:
भारतामध्ये एका ठिकाणी 10 हजार फूट उंचीवर एक असे पोलीस ठाणे आहे, जे वर्षभरात फक्त 5 महिने सुरू राहते. येथील गुन्हेगारी प्रमाणही शून्यच आहे. त्यामुळे हे ठिकाण राज्यातील सर्वात सुरक्षित ठिकाण मानले जाते. त्यामुळे मग हे पोलीस ठाणे कुठे आहे, नेमकं याठिकाणी कसं काम चालतं, हे जाणून घेऊयात. (हिमांशु जोशी/पिथौरागढ, प्रतिनिधी)
1/7
उत्तराखंड राज्यातील पिथौरागढमध्ये भारतीय सीमेवर असलेले गुंजी पोलीस ठाणे आहे. याठिकाणी मागील 7 वर्षात फक्त 5 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. भारत-चीन सीमेवरील अंतिम गावातील लोकांमध्ये बंधुभाव आणि सामाजिक जबाबदारीची भावना आहे. त्यामुळे याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या गुन्हा दाखल होत नाही.

advertisement
2/7
या पोलीस ठाण्यात फक्त एमवी अॅक्ट कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात आले आहे. तर येथे चोरी, हत्या, मारहाण, फसवणूक सारखे गुन्हे घडले नाहीत. पिथौरागढच्या धारचूला तालुक्यापासून जवळपास 72 किलोमीटर दूर असलेल्या आणि वर्षातून फक्त पाच महिने चालणाऱ्या गुंजी पोलीस ठाणे अंतर्गत 10 पेक्षा जास्त गाव येतात.

3/7
याठिकाणी जवळपास 4 हजार इतकी लोकसंख्या आहे. येथील लोक हिवाळ्यात खालच्या परिसरात येतात. यासोबतच गुंजी पोलीस ठाणे हेसुद्धा लोकांसोबत धारचूला शिफ्ट होते. सोबतच हिवाळ्यात याठिकाणी खूप स्थानिक लोकं आणि सैन्यदलातील लोक थांबतात.

4/7
पिथौरागढ येथील पोलीस अधीक्षक रेखा यादव यांनी माहिती देताना सांगितले की, गुंजीमध्ये आता आदि कैलाश यात्रेकरुंची संख्या वाढत आहे. असे असताना येथील पोलीस ठाण्याचा विस्तार केला जात आहे. खराब हवामान, वीज आणि दळणवळणाची कमतरता यामुळे येथील पोलिस स्टेशन चालवणे हे आव्हान आहे.

5/7
अशा परिस्थितीतही येथील पोलीस जवान हे 5 महिने येथील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवत आहेत. गुंजीमध्ये आता सीमा परिसरात पोलीस विभागाचे सर्वात वर चालवले जाणारे पोलीस ठाणे आहे.

6/7
समुद्र तळापासून हे पोलीस ठाणे 10 हजार 498 फूट उंचीवर आहे. कैलाश मानसरोवरची यात्रेच्या पार्श्वभूमीवर हे पोलीस ठाणे सुरू करण्यात आले होते.

7/7
दरवर्षी जून ते ऑक्टोबर या कालावधीत पोलीस ठाण्याचे कामकाज चालते. हे पोलीस स्टेशन उत्तराखंडमधील सर्वात कठीण ठिकाणी बांधले गेले आहे. त्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement