स्मशानभूमीतील वस्तूचा वापर अन् बनलं सुंदर Garden, हे दृश्य पाहायलाच हवं photos
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
अनेक जण हे भंगार विकून देतात. तर काही जण हे भंगाराचा वापर करुन त्यातून काही इतर गोष्टीही तयार करत आहेत. यातच आता राजस्थानच्या बिकानेरमधील एका व्यक्तीने टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केली आहे. बिकानेर शहरातील राणीबाजार परिसरात बांधण्यात आलेल्या शहीद मेजर कृष्ण गोपाल उद्यानात स्मशानभूमीत पडलेल्या बांबूपासून या उद्यानाचा कायापालट करून या उद्यानाच्या सौंदर्यात भर घातली आहे. (निखिल स्वामी, बिकानेर)
त्यासाठी स्मशानभूमीत पडलेल्या बांबूचा वापर करून ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे आता उद्यान अतिशय हिरवेगार आणि अतिशय सुंदर दिसते. याठिकाणी स्मशानभूमीत अनेक वर्षांपासून अंत्ययात्रेसाठी वापरण्यात आलेला बांबू पडून होता. त्यामुळे त्याचा योग्य वापर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
याचा वापर करण्यासाठी परिसरातील लोकांनी पार्कमध्ये लावण्याचा निर्णय घेतला. यानंतर स्मशानभूमीत पडलेल्या बांबूपासून नवीन कॉरिडोर तयार करण्यात आला. याला ग्रीन कॉरिडोरपण म्हटले जाते. या बांबूचा योग्य वापर करून हे उद्यान सुंदर दिसावे हा यामागचा उद्देश्य आहे. या बांबूंना रंग देऊन अतिशय सुंदर रचना करण्यात आली आहे.
advertisement
advertisement
सतीश मेनी यांनी सांगितले की, सुरुवातीला एक दोन लोकांच्या सहाय्याने काम सुरू केले. नंतर इतरही अनेक जण जोडले गेले. आधी या बगिचात कुणी येत नव्हते. निर्जीव असा हा बगीचा होता. त्यामुळे आता याचे रुपडे पालटले आहे. स्मशानभूमीच्या बांबूमुळे या उद्यानाला नवजीवन मिळाले आहे. तसेच येथील वातावरण आता प्रसन्न झाले आहे.