G20 Summit: बायडेन, सुनक यांच्यासह G20 नेते महात्मा गांधींच्या समाधीसमोर नतमस्तक; PM मोदींनी दिली खास भेटवस्तू
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
G20 Summit : भारतात जी२० शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सर्व नेते दिल्लीत राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले. याठिकाणी पंतप्रधान मोदींनी जी२० नेत्यांना खादीचा अंगरखा देत स्वागत केलं.
जी२० परिषदेला आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बानीज, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, चीनचे पंतप्रधान ली कियांग, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव आणि इतर राष्ट्राध्यक्षांनी महात्मा गांधींच्या समाधी स्थळी राजघाटावर श्रद्धांजली वाहिली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
युनायटेड नेशन्सचे महासचिव एंटोनियो गुटेरेस, आशियाई विकास बँकेचे प्रमुख मासात्सुगु असाकावा, जागतिक आरोग्य संघटनेचे टेड्रोस घेब्रेयेसस, जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिवा यांच्यासह इतर प्रतिनिधी महात्मा गांधींच्या समाधीसमोर नतमस्तक झाले.


