Methivada Recipe: बेसन आणि तांदळाचे पीठ न वापरता बनवा मेथीचा स्वादिष्ट वडा; हेल्दी, खुसखुशीत... सोपी रेसिपी
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर पालेभाज्या खाल्ल्या जातात. पालेभाज्या म्हटलं की, आपसूकच आपल्या नजरेसमोर मेथीची भाजी येते. मेथीच्या पानांमध्ये आयर्न, फायबर, कॅल्शियम, अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक असल्याने ती पचन सुधारते. शिवाय, मेथीची भाजी रक्तशुद्धी करते आणि शरीराला उष्णता देखील देते. जर तुम्हाला नाश्त्यामध्ये काही नवीन आणि टेस्टी खायचे असेल मेथीच्या भाजीचा कुरकुरीत वडा ट्राय करुन बघा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मेंदू वड्यासारख्या वड्यासाठी पुढीलप्रमाणे साहित्य लागते. जाणून घेऊया.... मेथीची 1 जुडी, अर्धा कप पोहे, दोन बारीक चिरलेले कांदे, चवीनुसार मीठ, एक चमचा साखर, एक चमचा बडीशेप, धने, जीरे, तीळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा चाट मसाला, एक चमचा आलं- लसूण पेस्ट, एक चमचा बेसन पीठ, आवश्यकतेनुसार पाणी आणि आवश्यकतेनुसार तेल इतक्या सामानाची आवश्यकता आहे.
advertisement
advertisement
advertisement


