तुमच्या डोक्यावर का घोंघावतात डास? जाणून घ्या कारण आहे खास!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
सायंकाळच्या वेळी आपल्या डोक्यावर घोंघावणारे डास प्रचंड सतावत असतात. पण हे आपल्या डोक्याभोवतीच का घोंघावतात याचं एक खास कारण आहे.
बऱ्याचदा आपल्या कानाजवळ किंवा डोक्यावर घोंघावणारे डास सतावून सोडतात. पण हे डास डोक्यावर फिरण्यामागं खास कारण आहे. शरीराचा वास आणि कार्बन डायऑक्साइड (CO2) यामुळे हे डास आपल्याकडे आकर्षित होतात. आपल्या त्वचेतून 340 पेक्षा जास्त रासायनिक पदार्थांची निर्मिती होत असते. यातील काही गंध हे डासांना त्यांच्या अन्नाप्रमाणे आकर्षित करतात.
advertisement
आपल्या घामातील काही रसायनेही डासांना आकर्षित करतात. अगदी 100 फूट अंतरावरूनही डासांना आपला वास येऊ शकतो. विशेषत: माणूस श्वासोच्छवासातून बाहेर टाकणाऱ्या कार्बन डायऑक्साइडची तर डासांना लगेच जाणीव होते. माणसांचा घाम लगेच सुखत नाही. जेव्हा कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो तेव्हा तो लगेच वर जातो. त्यामुळे डास डोक्याभोवती घोंघावतात.
advertisement
advertisement
advertisement
तुमच्या डोक्याभोवती डास येऊ नयेत आणि घोंघावण्याचा त्रास होऊ नये म्हणून खास काळजी घ्यावी. त्यासाठी लांब बाह्यांचे कपडे आणि पूर्ण पँट घालावी. तसेच मच्छरदानी लावावी. याशिवाय डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पाणी साठू देऊ न देणे यासारखे उपाय करता येतील. शिवाय आउटडोअर पंखे किंवा सिट्रोनेला मेणबत्त्या वापरल्यानेही डासांना रोखण्यात मदत होऊ शकते.