Weather Alret : महाराष्ट्रात धडकणार बर्फासारखी कोल्ड लाट, हवामान खात्याकडून 6 जिल्ह्यांना अलर्ट
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पुढील काही दिवसांत राज्यात थंडीच्या लाटा वाढण्याची शक्यता आहे. 3 डिसेंबर रोजीही राज्यातील 6 जिल्ह्यांत शीत लहरींचा इशारा देण्यात आला आहे.
यावर्षी हिवाळ्यात म्हणजेच डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. राज्यातील तापमानाचा पारा सरासरी किंवा सरासरीच्या खाली राहण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात पुढील काही दिवसांत थंडीच्या लाटा वाढण्याची शक्यता आहे. 3 डिसेंबर रोजीही राज्यातील 6 जिल्ह्यांत शीत लहरींचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. पाहुयात, 3 डिसेंबर रोजी राज्यातील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
नाशिकमधील तापमानात सर्वाधिक घट बघायला मिळत आहे. तेथील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 9 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर शहरात शीत लहरींचा इशारा देण्यात आला आहे. यासर्व ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
advertisement
advertisement









