Weather Alert : पुढील 3 दिवस धोक्याचे! महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट; 10 जिल्ह्यांना अलर्ट
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
राज्यातील एकूण 10 जिल्ह्यांना हवामान विभागाने 8 ऑक्टोबर रोजीसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पाहुयात 8 ऑक्टोबर रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. राज्यातील एकूण 10 जिल्ह्यांना हवामान विभागाने 8 ऑक्टोबर रोजीसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पाहुयात 8 ऑक्टोबर रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
मागील दोन दिवसांपासून राज्यात कमाल तापमानात घट झाल्याचं पहायला मिळत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाशासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या दोन्ही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दरम्यान मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील कमाल तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. शक्ती चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 10 ऑक्टोबर पर्यंत राज्यामध्ये हा पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.









